येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध कामांच्या अनुषंगाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक बदर, सर्व बँकांचे समन्वयक आणि प्रमुख अधिकारी, भाजप व्यापार आघाडीचे जिल्हा संयोजक तुषार काळबंधे, मनीष कापगते, राधेश्याम मुंगमोडे व उद्योग करण्यास इच्छुक असलेले तरुण उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आलेले प्रस्ताव आणि त्या तुलनेत प्रस्तावांना बँकांनी दिलेली मंजुरी पाहता खासदारांनी नाराजी व्यक्त केली. अनेक बँकांनी उद्योग उभारू इच्छिणाऱ्या तरुणांना कर्ज देण्यास प्रतिकूलता दाखविल्याने हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने राबविला गेला नाही. अशा बँकांना खासदारांनी ताकीद देत कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या उदयोन्मुख उद्योजकांच्या कर्ज प्रकारांना अडवून ठेवू नये, असे निर्देश दिले.
प्रधानमंत्री यांनी ही योजना तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे व्हावे या हेतूने आणली आहे. छोट्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. त्यामुळे या योजनेकडे बँकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असेही खासदार यांनी सांगितले.