लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विघ्नहर्ता गणरायाला घरी आणण्याची सर्वांना मोठी उत्सुकता लागली आहे. प्रत्येक घरात आणि गल्लीत गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. रस्त्यांवरील खड्डे विघ्नहर्ताच्या उत्सवात विघ्न निर्माण करू शकते. बाप्पा, यंदा सांभाळून रस्त्यावर खड्डे फार झाले अशी म्हणण्याची वेळ गणेशभक्तांवर आली आहे. प्रशासनाला खड्डे बुजविण्याची सद्बुद्धी गणरायाने द्यावी आणि गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त व्हावे अशी अपेक्षा आहे.भंडारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच मोठ्या गावातील रस्त्यांची पूर्ती चाळण झाली आहे. यावर्षी झालेल्या धुवाधार पावसाने रस्त्यांवरील खड्ड्यात भर घातली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. अवघ्या काही दिवसातच सर्वत्र गणरायाचे आगमन होणार आहे. गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सर्वत्र सुरु आहे. परंतु सार्वजनिक गणेश मंडळासमोर खड्ड्यांची मोठी समस्या आहे. भंडारा शहरातील राज्य मार्गावर मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांच्या रस्त्यावरूनच गणरायाचे आगमन भक्तांना करावे लागणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात भंडाराचा राजा आणि गणेशपूरचा राजा हे दोन गणेशमंडळ प्रसिद्ध आहेत. या सोबतच शहराच्या विविध भागात गणरायाची स्थापना केली जाते. मात्र यावर्षी पडलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या सिमेंट रस्त्यांची अवस्था तशी चांगली आहे. परंतु शहरातून गेलेल्या राज्य मार्र्गांची अवस्था बिकट आहे. जिल्हा परिषद चौक ते तुमसर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यासोबतच शहरातील विविध रस्तेही खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांची डागडुजी गणेशाच्या आगमनापूर्वी व्हावी अशी अपेक्षा आहे. यासोबतच जिल्ह्यातील विविध शहरातील अंतर्गत रस्तेही खड्डेमय आहे. स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. (सविस्तर वृत्त/ ४ वर)
बाप्पा, जरा सांभाळून, रस्त्यांवर खड्डे फार झालेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:44 PM
विघ्नहर्ता गणरायाला घरी आणण्याची सर्वांना मोठी उत्सुकता लागली आहे. प्रत्येक घरात आणि गल्लीत गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. रस्त्यांवरील खड्डे विघ्नहर्ताच्या उत्सवात विघ्न निर्माण करू शकते. बाप्पा, यंदा सांभाळून रस्त्यावर खड्डे फार झाले अशी म्हणण्याची वेळ गणेशभक्तांवर आली आहे. प्रशासनाला खड्डे बुजविण्याची सद्बुद्धी गणरायाने द्यावी आणि गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त व्हावे अशी अपेक्षा आहे.
ठळक मुद्देरस्त्यांची चाळणी : गणराया, खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सद्बुद्धी दे!