शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

अखेर धान खरेदी केंद्रावर पोहोचला बारदाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 5:00 AM

जिल्ह्यात आधारभूत ७३ धान खरेदी केंद्र अंतर्गत धान मोजणी चा हंगाम जोमात सुरू आहे. १८६८ रूपये या हमीभावाने धान खरेदी केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सातशे रुपये बोनस सुद्धा जाहीर झालेला आहे. बोनस मुळे शेतकरी समाधानी आहे. मात्र धानाची आधारभूत किंमत  शेतकर्‍यांना न परवडणारी आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी महागाईचा विचार करता आधारभूत किमतीत वाढ करणे नितांत गरजेचे आहे.

ठळक मुद्देजिल्हा पणन कार्यालय पुढाकार

  लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी भात गिरणीतून वापरून झालेला गतवर्षाचा बारदाना मिळाला होता. त्यातून काही फाटका निघाल्याने धान मोजणी वेळेस बारदान याचा तुटवडा भासला. ‘लोकमत’ने बारदाना अभावाने धान खरेदी प्रभावित या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्याची जिल्हा पणन कार्यालयाने तत्काळ दखल घेत पालांदूर येथे बारदाना पुरवठा केला. जिल्ह्यात आधारभूत ७३ धान खरेदी केंद्र अंतर्गत धान मोजणी चा हंगाम जोमात सुरू आहे. १८६८ रूपये या हमीभावाने धान खरेदी केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सातशे रुपये बोनस सुद्धा जाहीर झालेला आहे. बोनस मुळे शेतकरी समाधानी आहे. मात्र धानाची आधारभूत किंमत  शेतकर्‍यांना न परवडणारी आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी महागाईचा विचार करता आधारभूत किमतीत वाढ करणे नितांत गरजेचे आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाख ९३ हजार हेक्टरवर  धानाची  लागवड केलेली होती. यात बरीच शेती पुरात नुकसानग्रस्त ठरली. तर कित्येक हेक्टर शेतीवर तुडतुड्याने  आक्रमण करीत उत्पन्न निम्म्यावर आणले. त्यामुळे यावर्षी उत्पन्नात पर्यायाने आधारभूत खरेदी केंद्रावर निश्चितच कमी खरेदी नोंदण्याची शक्यता दाट आहे.दरवर्षी खरेदी केंद्रावर बारदान याची समस्या असतेच. बारदान शिवाय खरेदी केली जात नाही. यामुळे खरेदीला विलंब होतो. अशा प्रसंगी शेतकऱ्यांचाच बारदाना वापरून त्या बारदान याचा बाजार दरानुसार शेतकऱ्याला मोबदला दिल्यास, निश्चितच शेतकरी वर्गासह खरेदीला सुद्धा त्रास होणार नाही. अशी अपेक्षा काही शेतकरी वर्गातून उमटलेली आहे. विनाविलंब सुरळीत खरेदी केंद्र चालविण्याकरिता पणन कार्यालयाने धान खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वीच नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते. मात्र अधिकारी वर्गांना लोकप्रतिनिधींच् योग्य ते सहयोग वेळेत मिळत नसावा काय? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. जेवढा उशीर खरेदीला होईल तेवढाच नुकसान शेतकरी वर्गाला सहन करावा लागतो. गत पंधरा दिवसापासून खरेदी आटोपली आहे. मात्र त्या खरेदी चा रुपयासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही जमा झालेला नाही. कापणी, बांधणी, मळणी, वाहतूक ,हमाली या सगळ्या गोष्टीवर नगदी रुपया खर्च करावा लागतो. त्यामुळे शेतकरी वर्ग नुकसान सहन करीत खासगी वापराला काही प्रमाणात धान विकून तात्पुरती गरज भागवितो. यामुळे बोनस वगळता दर क्विंटलला २५०  रुपये चा तोटा सहन करावा लागतो.३१ मार्चपर्यंत धान खरेदीचा मुहूर्त असला तरी त्यापूर्वी खरिपाचा हंगाम उभा करण्याकरिता पैसा नितांत गरजेचे आहे. त्यामुळे पणन कार्यालयाने पारदर्शकता ठेवत धान खरेदी केंद्रावर मोजणी होताच ,किमान हप्ता भरात तरी पैशाची व्यवस्था करावी. अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.पालांदूर परिसरात जेवणाळा, देवरी/ गोंदि, मेंगापूर, पालांदूर या चार केंद्रावर धान खरेदी सुरु आहे. लाखनी तालुक्यात सर्वाधिक खरेदी असून ३९ हजार ७७५  क्विंटल धान शनिवार पर्यंत मोजणी करण्यात आले. लाखनी तालुक्यात मोठा अर्थात ठोकळ धानाची लागवड सर्वाधिक आहे. यात १०१० जातीच्या धाना सारखा लांब धान ‘अ’ दर्जाचा आहे. त्याची लांबी व जाडी तपासून त्याला अ दर्जात खरेदी करायला पणन कार्यालयाने पुढाकार घ्यावा. यापूर्वी लाखनी तालुक्यात या धानाला ‘अ’ दर्जात खरेदी करण्यात आला होता. हे उल्लेखनीय.

टॅग्स :market yardमार्केट यार्ड