इंद्रपाल कटकवार भंडारापाण्याचे मोठ्या प्रमाणात स्त्रोत असतानाही सिंचन क्षमता नाममात्र असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता सामूहिक शेततळी योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून १६ .६५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून टंचाईच्या काळात बांधण्यात येणाऱ्या शेततळ्यातून पिकांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा मानस असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सामूहिक शेततळे योजना भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द धरण, बावनथडी प्रकल्प, सोंड्याटोला उपसा सिंचन योजना, नेरला उपसा सिंचन योजना, करचखेडा उपसा सिंचन योजना यासारखे अनेक लहानमोठे प्रकल्प आहेत. मात्र बहुतांश प्रकल्प आजही कार्यान्वित झालेले नाही. पावसाच्या पाण्यावर शेती करणाऱ्या बळीराजाला योजनेच्या माध्यमातून सिंचनाचे बळ मिळावे, जेणेकरून उत्पन्नात वाढ होऊ शकेल. विशेष म्हणजे पूर्वी तयार केलेले शेततळे, नैसर्गिक खड्डा, दगड खाणी, विहिर आदी जागी सामूहिक शेततळे मंजूर करण्यात येणार नाही. या शेततळ्यातील पाणी वापरण्यासाठी अधिक कार्यक्षमता असलेल्या सिंचन पद्धतीचा (विशेष करून ठिंबक व तुषार) वापर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना मिळणार लाभनवीन सामूहिक शेततळ्याच्या लाभ अनुसुचित जातीच्या शेतकऱ्यांना १६ टक्के, अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना ८ टक्के, अपंग प्रवर्गासाठी ३ टक्के व सर्वसाधारण प्रवर्ग ७३ टक्के असा देण्यात येणार आहे. प्रत्येक प्रवर्गातंर्गत महिलांना समांतर ३० टक्के या प्रमाणात लाभ देणे बंधनकारक आहे. या योजनेत समुहात दोन किंवा तीन लाभार्थ्यांचा समावेश राहणार आहे. तसेच एकाच कुंटुंबातील किंवा संयुक्त कुंटुंबातील एकापेक्षा जास्त शेततकऱ्याला यात सहभागी होता येणार नाही. या शेततळ्याचे (तलावाचे) एकूण तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहेत.
सिंचनासाठी सामूहिक शेततळ्यांचा आधार
By admin | Published: September 26, 2015 12:30 AM