लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) धरण ओव्हरफ्लो झाला असून प्रकल्पाचे चार वक्रद्वार शनिवारी ७ वाजता ६० सेंटीमीटर उघडण्यात आले. त्यातून ४०२ क्युसेक पाण्याचा विसर्ग बावनथडी नदी पात्रात करण्यात आला. तर पुन्हा सकाळी १० च्या सुमारास पाच वक्रद्वार उघडून १०७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. २०१३ नंतर प्रथमच बावनथडी धरण १०० टक्के भरला आहे, हे येथे उल्लेखनीय.बावनथडी धरण मागील २४ तासात धरणात ८०१ क्युमेक्स दराने पाण्याचा येवा आला असून धरण परिसरात ११६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. २०१३ नंतर बावनथडी धरण या मौसमात पूर्ण शंभर टक्के भरला आहे.सध्या धरणात ३४४.४० मिटर पाणीसाठा आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचा हा आंतरराज्यीय प्रकल्प असून बावनथडी नदीवर सदर धरण सीतेकसा गावाजवळ आहे. दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांकरिता वरदान ठरलेला प्रकल्प पूर्ण भरल्याने शेतकरी व नागरिकांत आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावाला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी वेळेवर सूचना मिळाली नाही.मार्ग बंदबावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यावर मध्यप्रदेशातील बडपाणी गावाजवळील नवनिर्मित पुल पाण्याखाली गेला असून मध्यप्रदेश व महाराष्ट्रीतीय ये - जा बंद करण्यात आली. ग्रामीण भागाला जोडणारा हा पूल आहे.आंतरराज्यीय बावनथडी धरण शंभर टक्के भरला असून शनिवार सकाळपासून बावनथडी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदी काठावरील गावाने सतर्क राहण्याची गरज आहे. धरण तुडूंब भरल्याने सिंचनाला लाभ होणार आहे.-आर.आर. बडोले, सहाय्यक अभियंता बावनथडी प्रकल्प.
बावनथडी धरण ओव्हर फ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 5:00 AM
सध्या धरणात ३४४.४० मिटर पाणीसाठा आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचा हा आंतरराज्यीय प्रकल्प असून बावनथडी नदीवर सदर धरण सीतेकसा गावाजवळ आहे. दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांकरिता वरदान ठरलेला प्रकल्प पूर्ण भरल्याने शेतकरी व नागरिकांत आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावाला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी वेळेवर सूचना मिळाली नाही.
ठळक मुद्देधरणातून पाण्याचा विसर्ग व रस्ता बंद