शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘बावनथडी’चे कोट्यवधींचे ‘आऊटलेट्स’ उद्ध्वस्त

By admin | Published: April 01, 2016 1:12 AM

बावनथडी प्रकल्पाचे दगडी आऊटलेट प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेले. आऊटलेट उद्ध्वस्त झाल्याचा खूणा तेवढ्या शिल्लक आहेत. सन १९९० मध्ये ह्या आऊटलेटस बांधल्या होत्या.

लोकप्रतिनिधींचे लक्ष जाणार काय? : नवीन बांधकामाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबितमोहन भोयर तुमसरबावनथडी प्रकल्पाचे दगडी आऊटलेट प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेले. आऊटलेट उद्ध्वस्त झाल्याचा खूणा तेवढ्या शिल्लक आहेत. सन १९९० मध्ये ह्या आऊटलेटस बांधल्या होत्या. सन २०१२ ते २०१६ पर्यंत खरीप व रब्बी हंगामात केवळ आठ ते दहा वेळा पाणी सोडण्यात आले हे विशेष कोट्यवधीचे सिमेंट आऊटलेटस तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामाला सन १९७६ मध्ये सुरुवात झाली होती. बावनथडी प्रकल्पाचा उजवा मुख्य कालावा असून त्याला समांतर इतर लहान कालवे बांधण्यात आले. या कालव्यांना दगडी लेआऊटलेट सन १९९० च्या सुमारास बांधण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या शेतात या आऊटलेटमधून लहान वितरिकेत कालव्यातून पाणी सोडण्यात येते. तुमसर व मोहाउी तालुक्यात असे दगडी आऊटलेट्स मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आले आहेत. अपवाद वगळता सर्वच आऊटलेटस उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.तुमसर तालुक्यातील हिंगणा व काटेबाम्हणी शिवारात प्रत्यक्ष भेट दिली असता हा प्रकार आढळला. सन १९९० पूर्वी राज्यात कालव्याचे आऊटलेटस दगडांचे बांधले जात होते. हे विशेष धरणातून पाणी सोडल्याने पाण्याच्या प्रवाहात मोठा जोर असतो हे दगड पाण्याचा प्रवाह सहन केल्रूाची क्षमता नसल्याने या प्रकल्पाचे सर्वच आऊटलेट्स उद्ध्वस्त झाले. दगडी आऊटलेट्स बांधकामाची गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर या बांधकामाला सुमारे २५ वर्षे झाली. त्यामुळे या आऊटलेटसचे आयुष्य संपल्याचे बोलले जाते. प्रथम धरण, कालवे बांधल्यानंतर वितरिका व आऊटलेटची कामे करण्याची गरज होती. परंतु या प्रकल्पात प्रथमत: सिमेंट पूल, आऊटलेटस् सारख्या बांधकामाला सुरुवातीपासूनच प्रथम प्राधान्य देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.शेतकऱ्यांच्या जमिनी घेणे, वितरिकांचे जाळे तयार करणे ही प्राथमिक कार्ये अजूनही पूर्ण झाली नाहीत तर बांधकामांना २० ते २५ वर्षे होत आहेत. अनेक ठिकाणी कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण उखडून वाहून गेले. राज्य शासनाने सन २०१७ मध्ये प्रकल्प पूर्णत्वाची हमी दिली आहे. उद्ध्वस्त झालेल्या आऊटलेट्स पुन्हा सिमेंट क्राँक्रीटच्या तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हे विशेष.