ग्रीन हेरिटेजचे आवाहन : महालाचा काही भाग अत्यंत जीर्णावस्थेतलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐतिहासिक पांडे महाल वाचविण्याकरिता विविध संघटना राजकीय पक्ष व नागरिकांकडून प्रयत्न सुरू आहे. हस्ताक्षर व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्थानिक नागरिक मुले-मली, पुरूष-महिला, पर्यटक पांडे महाल बघण्याकरिता हजेरी लावत आहेत. दर्शनाकरिता येणारे नागरिक रंग महालाच्या वरच्या मजल्यावर जावून महालाचे दर्शन करीत आहेत. जे धोक्याचे आहे. २००८ मध्ये ग्रीन हेरिटेजच्या मागणीवरून पुरातत्व विभागाचे संचालक व सहायक संचालक यांनी आपल्या पथकासोबत पांडे महालाची पाहणीदरम्यान हा भाग अत्यंत धोक्याचे असल्याचे सांगितले होते.मध्यंतरी महालाची स्थिती जीर्णावस्थेत पोहोचल्यावर पांडे कुटुंबियांनी महालाला सोडून नागपूर येथे जावून वसले. तेव्हापासून इकडे सतत दुर्लक्ष झाले. अशातच महालाची स्थिती नाजूक अवस्थेत पोहोचली असून जागोजागी प्लॉस्टर निघालेला आहे. लोखंडी बीम पावसामुळे नष्ट होऊन काही भाग तुटून खाली पडलेला आहे. वरचा मजला नाजूक अवस्थेत असल्याने तो कधीही जमीनदोस्त होऊ शकतो. ग्रीन हेरिटेजतर्फे याबाबत माजी सहायक संचालक आनंद भोयर यांना नागपूर येथे कळविले असता त्यांनी हा भाग अत्यंत धोक्याचे असल्याचे सांगितले. नागरिक व पर्यटकांना महालाचे दर्शन करायचे असल्यास मुख्य प्रवेशद्वाराच्या आत असलेल्या प्रांगणातून बघता येईल. सोबतच देवघरच्या भागात असलेल्या छपरीतील ऐतिहासिक वस्तू पाहता येईल. शासनातर्फे पांडे महालाच्या वारसांना योग्य तो मोबदला देऊन महालाचे जतन व संरक्षण करून ही वास्तू संग्रहालय करण्याकरिता पाऊले उचलण्यात यावे, असे पत्र ग्रीन हेरिटेजतर्फे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
पांडे महाल बघताना सावधगिरी बाळगा
By admin | Published: June 07, 2017 12:35 AM