लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : आरोग्यबाबद महिला चालढकल वृत्ती ठेवतात. दैनंदिन कामाच्या व्यस्ततेत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबरोबर महिलांना नियमित होणाऱ्या त्रासावर यावर तात्पुरते उपाय हे महिलांच्या अनेक व्याधींना कारणीभूत आहे. यामुळे महिलांनी आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूक असावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सुचिता आगाशे यांनी केले.वरठी येथे सनफ्लॅगच्या सीएसआर निधीतून शाळा महाविद्यालयात लावण्यात आलेल्या सॅनेटरी मशीनच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होते. सनफ्लॅग स्कूल वरठी येथे लावण्यात आलेल्या मशीनचे लोकार्पण सुचिता आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. वरठीच्या सरपंच स्वेता येळणे यांच्या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून गावातील ५ शाळा महाविद्यालयात सॅनेटरी नॅपकिन मशीन लावण्यात आल्यात. महिला व मुलींना होणार त्रास लक्षात घेऊन महिलांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना समोर जात यावे म्हणून हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. लवकरच वरठी येथील अन्य महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी या मशीन लावण्यात येणार असल्याची माहिती सरपंच स्वेता येळणे यांनी दिली.प्रमुख पाहुणे म्हणून लायनेस क्लबच्या संगीता सुखानी, ग्राम पंचायत सदस्य सीमा डोंगरे, मंदा साखरवाडे, गीता बडवाईक, शिल्पा गजभिये, ललिता बावणे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच श्वेता येळणे होत्या. वरठी येथील सनफ्लॅग स्कूल, जिल्हा परिषद हायस्कूल, नवप्रभात कन्या शाळा, स्व. पार्वतीबाई मदनकर महाविद्यालय व नवप्रभात कनिष्ठ महाविद्यालयात सॅनेटरी मशीन लावण्यात आले आहेत. दरम्यान शालेय मुलींना याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. महिला व मुलींना असणाºया आरोग्याशी जुडलेल्या समस्या तात्काळ सोडवून मुलींना मनात न्यूनगंड ठेवू नये, असे आवाहन येळणे यांनी केले. सनफ्लॅग स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात आरती आकरे, प्रियका बडवाईक, केतकी जोशी व वंदना शर्मा उपस्थित होत्या.
महिलांनो,स्वच्छता, आरोग्याविषयी सजग व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:15 PM
आरोग्यबाबद महिला चालढकल वृत्ती ठेवतात. दैनंदिन कामाच्या व्यस्ततेत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबरोबर महिलांना नियमित होणाऱ्या त्रासावर यावर तात्पुरते उपाय हे महिलांच्या अनेक व्याधींना कारणीभूत आहे.
ठळक मुद्देसुचिता आगाशे : सॅनेटरी मशीनचा लोकार्पण सोहळा