लवकरच रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. त्यातून ३० ते ४० दिवस मजुरांना काम मिळणार आहे. गत तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतील आहे. त्यामुळे काही ठिकाणी रोवणी होवू शकली नाही. खंडीत वीज पुरवठ्याचाही रोवणीला फटका बसण्याची शक्यता आहे.
बॉक्स
शेतशिवार मजुरांनी फुलले
खरीप हंगामाला प्रारंभ झाला असून शेतशिवार मजुरांनी फुलले आहे. प्रत्येक शेतात आता मजुरांची चहलपहल दिसत आहे. शेतकऱ्यांचीही लगबग वाढली आहे. तब्ब्ल महिना दीड महिना शेत मजुरांनी फुललेले दिसणार आहे.
कोट
पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असल्याने रोवणी शक्य झाली. देश सेवेसाठी आयुष्य खर्ची घातले. आता स्वत: शेतात श्रम करून देशसेवा करण्याचा मानस आहे. जय जवान जय किसान हा नारा प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न आहे.
-अरविंद मस्के, माजी सैनिक पालांदूर.