येथील नूतन महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक परिषदेच्या कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील सातही तालुक्यातील प्रतिनिधी व नागपूर विभाग अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी अंगेश बेहलपाडे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली. यापूर्वी ते शिक्षक परिषदेत तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. जिल्हा कार्यवाह म्हणून २७ वर्षे म्हणून काम पाहिले. त्यांच्या रिक्तपदी तुमसर येथील पी.एम. नाकाडे यांची जिल्हा कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली.
या सभेला नागपूर विभाग अध्यक्ष के.के. बाजपेयी, अशोक वैद्य, दिशा गर्दे, मनिषा काशीवार, अशोक रंगारी, के.डी. बोपचे, राधेश्याम धोटे, राजेश निंबार्ते, राजू बारी, दिलीप वाणी, महादेव तेलमासरे, यादव गायकवाड, हरिहर पडोळे, प्रदीप गोमासे, लोकानंद नवखरे, पुरुषोत्तम डोमळे, पांडुरंग टेंभरे, नीळकंठ कापगते, सुभाष गरपडे, एस.सी. कुथे, अविनाश पाठक, प्रयाण भाजीपाले आदी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल आमदार नागो गाणार यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी परिषदेतर्फे प्रयत्न केले जातील, असे सांगितले.