आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. छत्रपती शिवरायांचे तैलचित्र काढण्याबरोबर त्यांच्या गणिमी काव्याचे सदविवेक बुध्दीचे गुणात्मक विचार आपल्या डोक्यातील मेंदुमध्ये संग्रहीत करुन समावेशक समाजामध्ये आचरणात आणावे तरच खऱ्या अर्थाने शिवजंयती साजरी करण्याचे सार्थक ठरेल, असे प्रतिपादन आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले.शिवाजी जयंती उत्सव समिती ठाणा पेट्रोलपंपद्वारे शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आमदार फुके बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर हे होते. यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम, ग्रामपंचयत ठाणाचे सरपंच सुषमा पवार, शहापुरचे सरपंच मोरेश्वर गजभिये, खरबी (नाका) चे सरपंच रत्नमाला वाडीभस्मे, गॅस ग्रामीण वितरण सुनिल खन्ना उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर म्हणाले की, शिवाजी महाराज सर्व समाजाला घेऊन चालणारे सेनानायक होते. शिवाजींच्या नावातच त्यांची कार्यशैली दडलेली आहे. ‘शि’ म्हणजे शिका, ‘वा’ म्हणजे वागा, ‘जी’ म्हणजे जिंका अर्थात शिवाजींच्या गुणाप्रमाणे शिक्षण ग्रहन करुन वागा व गणिमी काव्याद्वारे आपला शत्रु ओळखून त्यावर विजय मिळवीत ध्येय साध्य करा.सकाळी ठाणा पेट्रोलपंप येथील युवा मुस्लीम बांधवातर्फे सामुहिक भोजन दानाचे वितरण करण्यात आले. येथे हिंदु- मुस्लिम एक्य सद्भावना दिसायला मिळाली. दुपारच्या सुमारास नि:शुल्क नेत्र तपासणी व गरजु रुग्णांना अत्यल्प दरात चष्माचे वितरण करण्यात आले. तद्नंतर भव्य बाईक रॅली ठाणा- परसोडी- जवाहरनगर, खरबी-शहापुर मार्गे ठाणा टी पॉर्इंट येथे विसर्जीत करण्यात आली. सायंकाळी पंचवीस महिलांचा लेझीम कवायतीद्वारे विविध ठिकाणी कलेची सादरीकरण करण्यात आले. सायंकाळी पाहुण्यांचे भाषणे झाली व स्वराध्य संगीत ग्रुप अमरावती द्वारे शिव संध्याचे आयोजन करण्यात आले. यात अध्य गायकांनी श्रोत्यांचे मने जिंकले. प्रास्ताविक सी. दुरुगकर यांनी केले. संचालन व आभार सचिन तिरपुडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी शिवजंयती उत्सव समिती, ग्रामपंचायत कार्यालय ठाणा, तंटामुक्त समिती, कल्याणी तिरपुडे ग्रुपचे महिला, लोकसेवा मंडई उत्सव समिती व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.
शिवबांच्या विचाराप्रमाणे आचरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:09 PM
शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. छत्रपती शिवरायांचे तैलचित्र काढण्याबरोबर त्यांच्या गणिमी काव्याचे सदविवेक बुध्दीचे गुणात्मक विचार आपल्या डोक्यातील मेंदुमध्ये संग्रहीत करुन समावेशक समाजामध्ये आचरणात आणावे तरच खऱ्या अर्थाने शिवजंयती साजरी करण्याचे सार्थक ठरेल, असे प्रतिपादन आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले.
ठळक मुद्देपरिणय फुके यांचे प्रतिपादन : ठाणा-पेट्रोलपंप येथील शिवजयंतीचे उद्घाटन