शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

योजनेचा गरिबांना लाभ हीच खरी समाजसेवा

By admin | Published: March 06, 2017 12:15 AM

अधिकारी यांना जनतेच्या प्रश्नाकडे कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आपण जनतेचे सेवक आहोत.

नाना पटोले : साकोलीत जनता दरबार, पाणी, रुग्णालय, बीपीएलचा प्रश्न गाजलासाकोली : अधिकारी यांना जनतेच्या प्रश्नाकडे कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आपण जनतेचे सेवक आहोत. सामाजिक भान ठेवून सामाजिक दृष्टीकोण ठेऊन मनाची मानसिकता बदलवून समाजाला आपले काही देणे आहे हे समजले पाहिजे. अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ गरीबांना दयावा हीच खरी समाजसेवा आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांनी गरीब जनतेला त्रास देवू नये, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. येथील मंगलमुर्ती सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनिंयत्रण अंतर्गत खासदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार बाळा काशिवार, जि.प. सदस्य होमराज कापगते, जि.प. सदस्य डॉ. नेपाल रंगारी, रेखा वासनिक, दिपक मेंढे, सभापती धनपाल उंदिरवाडे, अशोक कापगते, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, तहसिलदार खडतकर, पोलिस निरिक्षक जगदिश गायकवाड, आदी उपस्थित होते.जनता दरबारात मुंडीपार येथील वैशाली विजय पटले यांनी भेल प्रकल्प केव्हा सुरू होणार व बेरोजगारी कधी दुर होणार याविषयी प्रश्न विचारला. डॉ. नरेश राऊत यांनी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालय आॅक्सीजनवर असुन विद्युत, पाणी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा आदी व्यवस्था करण्यात यावी हा मुद्दा उचलला. साकोली नगरपरिषदेचे नगरसेवक रोहिणी मुंगूलमारे यांनी खूप लोक गरीब आहेत, परंतु त्यांचे दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नाही. त्यामुळे त्यांना योजनेपासुन वंचित राहावे लागत आहे, हा मुद्दा उपस्थित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. गोंडउमरी येथील पौर्णिमा चांदेवार यांनी गोंडउमरीत दारुबंदी असुन सुध्दा दारु सुरु राहते, हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विषयाची नोंद घेतली. असे अनेकांनी विविध प्रश्न विचारले त्यावर अनेक अधिकाऱ्यांनी उत्तर दिले पंरतु प्रत्यक्ष त्यांच्या अर्जाचा विचार करुन प्रश्न निकालात काढावे नाहीतर जनता दरबार संपला आपल्याला काम करायचे आहे. असे वेळकाढु धोरण बरोबर नहाी. एकुण प्रशासनाकडे २०० अर्ज प्राप्त झाले व वेळेवर वेगळे प्रश्न उपस्थित झाले.नाना पटोले यांनी एका अधिकाऱ्याला विचारले साकोली तालुक्यात पाणी टंचाई आहे काय? त्या अधिकाऱ्याने आकडेवारीवरुन कोणत्याच गावात पाणी टंचाई असे सांगितले पंरतु जनता दरबारातील खुप लोक उठून आमच्या गावात पाणी टंचाई प्रत्यक्ष या आम्ही सांगतो. त्यावेळेस अधिकाऱ्यांची खासदारासमोर धांदल झाली. कित्येक गावात पाणी टंचाई आहे हे जरा लक्षात घ्या तसे सर्वेक्षण करा, असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य बीपीएल अंतर्गत कुटूंबातील प्रमुख व्यक्ती मृत पावले, तर त्या योजनेअंतर्गत २० हजार रुपये दिले जाते. अशा ३३ लाभार्थ्यांना खा. पटोले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. एकंदरीतच अनेक समस्या या जनता दरबारातून लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यात आल्या. या समस्या सोडविण्यासाठी शासन - प्रशासन पुढाकार घेण्याची खरी गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)