पवनी : पंचायत समितीच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ संकल्प उत्सवाचे आयोजन नगर पालिका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सभागृहात करण्यात आले. पथनाट्य व विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थिनी व पालकांचे प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंजली भाजीपाले यांचे अध्यक्षतेखाली संकल्प उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. रजनी थोटे, पोलीस उपनिरीक्षक धनश्री डहाके, वैद्यकिय अधिकारी माधूरी खोब्रागडे, अॅड. साधना येळणे, गट शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे, दिपाली झिलपे यावेळी उपस्थित होत्या. महिलांची सुरक्षा व विद्यार्थीनींनी शैक्षणिक जीवनात घ्यावयाची काळजी या विषयावर पोलीस उपनिरीक्षक धनश्री डहाके यांनी मार्गदर्शन केले. मुलींच्या आरोग्यविषयक समस्या व उपायांची माहिती डॉ. माधुरी यांनी दिली. स्त्री भृणहत्या व कायदेविषयक बाबी यावर अॅड. येळणे यांनी मार्गदर्शन केले. रजनी थोटे यांनी स्त्रीयांच्या सामाजिक समस्या व महिलांना मिळणारी वागणूक या विषयावर विचार प्रगट केले. प्रास्ताविक प्राचार्य आर. एन. येटे यांनी केले. संचालन एम.पी. कोल्हे, बी. बी. ढोलेवार यांनी तर आभार एस. डी. उताणे यांनी मानले. विद्यार्थीनींनी बेटी बचाओ, बेटी पढाओ विषयावर पथनाट्य सादर केले. शाळेच्या विद्यार्थीनी व त्यांचे पालक उपस्थित होते. पालिका विद्यालयाच्या शिक्षक शिक्षिकांनी कार्यक्रमाला सहकार्य केले (तालुका प्रतिनिधी)
बेटी बचाओ, बेटी पढाओ संकल्प
By admin | Published: February 14, 2017 12:20 AM