शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

खबरदार, स्कार्फ बांधून दुचाकी चालवाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 9:24 PM

शहरासह ग्रामीण भागातही शहरी भागातही दुचाकी चालविताना तोंडाला स्कार्फ बांधण्याची फॅशन आली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ बांधला जात असला तरी अलीकडे रात्रीसुद्धा स्कार्प बांधून भटकणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देपोलीस करणार कारवाई : चोरीला आळा घालण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरासह ग्रामीण भागातही शहरी भागातही दुचाकी चालविताना तोंडाला स्कार्फ बांधण्याची फॅशन आली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ बांधला जात असला तरी अलीकडे रात्रीसुद्धा स्कार्प बांधून भटकणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली आहे. असे स्कार्फ बांधून फिरणारे वाहन चालक आता पोलिसांच्या निशाण्यावर असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पोलीस खात्याने घेतला आहे.शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुचाकीची संख्या वाढली आहे. प्रत्येकजण घराबाहेर पडताना दुचाकी घेऊनच निघतो. हेल्मेट ऐवजी अनेकजण तोंडाला स्कार्फ बांधतात. वेगवेगळ्या रंगाचे दुपट्टे तोंडाला बांधल्या जात असल्याने दुचाकी चालक नेमका कोण आहे याचा थांगपत्ता लागत नाही.उन्हापासून बचाव आणि त्वचेच्या रक्षणासाठी स्कार्फ बांधला जात असल्याचे दुचाकी चालक सांगतात. परंतु सर्रास दुचाकी चालक रात्रीसुद्धा तोंडाला स्कार्प बांधून भटकंती करतात. मुलींमध्ये तर स्कार्फ बांधण्याची जणून फॅशनच आली आहे. दुचाकीवरून जाणारी मुलगी आपल्या वडिलांनाही ओळखू येणार नाही, अशा पद्धतीने स्कार्फ बांधतात. या सर्व प्रकाराने आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र, नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचे प्रकार शहरात घडत आहे. काही ठिकाणी एटीएम फोडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या घटना घडल्या तेव्हा आरोपी दुचाकीवरून आलेले आणि तोंडाला स्कार्फ बांधून असलेलेच होते. त्यामुळे या आरोपींची ओळख पटविणे कठीण जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ही मंडळी सापडत नाही. त्यामुळे पोलिसांना आरोपी शोधने मोठे कठीण जाते.आता शहरात स्कार्फ बांधून फिरणारे दुचाकीस्वार पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. तोंडाला स्कार्फ बांधून फिरणाऱ्या वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्याचा निर्णय स्थानिक गुन्हे शाखेने घेतला आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आर.ए. मानकर यांनी केले आहे. तसेच पालकांनीसुद्धा आपल्या मुला-मुलींना स्कार्प बांधून दुचाकी चालवू नये असी समज देण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.अल्पवयीन दुचाकी चालकावर कारवाईविनापरवाना वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. त्यातच अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना शहरात दिसतात. शाळकरी मुलांचाही यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. परवाना नसताना पालक आपल्या मुलांच्या हाती दुचाकी देतात. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात नजर टाकली तरी अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना दिसून येतात. अशा दुचाकी चालकांवरही पोलीस आता कारवाई करणार आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना परवाना काढून द्यावा. परवाना नसेल तर त्यांना दुचाकी देवू नये, असे आवाहन करण्यात आले.जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालकांनी तोंडाला स्कार्प बांधू नये. स्कार्फ बांधल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल. तसेच अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यासाठी पालकांनी देवू नये. अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळल्यास मुलांसोबत पालकांवरही मोटरवाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.-विनिता शाहू, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा.