भंडारा : गत काही दिवसांपासून तापमानाने अचानक उचल घेतली असून पारा दिवसागणिक अंशाने वाढत आहे. शुक्रवारी पारा ४३ अंश सेल्सिअश इतक्या तापमानाची नोंद झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात उकाळा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मार्च महिन्यात सरासरी राहिलेले जिल्ह्यातील तापमान शेवटच्या काही दिवसात मात्र झपाट्याने वाढले आहे. सुर्य आग ओकू लागल्याने तापमानात झटपट वाढ असून शहरात मोठा उकाळा जाणवत आहे. गुरुवारचे तापमान ४२.५ अंश सेल्सिअश होते. शुक्रवारला तापमानात पुन्हा वाढ झाली असून पारा ४३ अंश सेल्सिअशवर पोहचला. अचानक वाढलेल्या या उष्म्यापासून नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे. उन्हामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. दुपारच्या सत्रात बाजारपेठेत देखील तुरळक ग्राहक दिसून येत आहेत. या वाढत्या तापमानामुळे दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्यतज्ज्ञांनी दिल्या आहेत. याचे पालन होणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)
भंडारा @ ४३
By admin | Published: April 01, 2017 12:37 AM