लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे आयोजित ३० व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना २३ सप्टेंबरला नवप्रमात शाळेच्या पटांगणावर पार पडला. यात मुलं गटातून भंडारा जिल्हा तर मुली गटातून गडचिरोली जिल्ह्यान प्रथम क्रमांक पटकावित बाजी मारली.मुलात द्वितीय व तृतीय क्रमांकावर अनुक्रमे वाशीम व अमरावती तर मुलीत वर्धा व भंडारा संघानी क्रमांक पटकाविला. आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एकूण ११ जिल्ह्यातील संघानी सहभाग घेतला. यात भंडारा, अमरावती, गडचिरोली, वाशिम, वर्धा, गोंदिया, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर जिल्ह्याचा सहभाग होता. विजयी संघाला मोहाडी, तुमसर क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे व उपस्थित मान्यवराच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. त्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व म्हाडाचे सभापती तारीक कुरैशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, मोहाडीचे तहसीलदार सुर्यकांत पाटील, क्रीडा अधिकारीप्रशांत दोंडल, जिल्हा परिषद सदस्य चंदु पिल्लारे, जिल्हा परिषद सदस्या राणी ढेंगे, कांद्रीच्या सरपंचा शाळू मडावी, अरविंद कारेमोरे, अनिल जिभकाटे, माजी सभापती हरिश्चंद्र बंधाटे, विलास मामुलकर, उपसरपंच प्रमेश नलगोपुलवार, विजश्री वाघमारे, राणी वाघमारे आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती. ३० व्या सबज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद आमदार चषक कबड्डी स्पर्धा २०१८ च्या यजमान पदाचा मान भंडारा जिल्ह्याला मिळाला. याकरिता हॅप्ी हेल्प बहु. क्रिडा मंडळ कांद्री व भंडारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे करण्यात आले. तीन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी पावसाने आणल्यामुळे स्पर्धेचे उद्घाटन २१ सप्टेंबर ऐवजी २२ सप्टेंबरला करण्यात आले. नियोजित ठिकाणी पाणी साचल्याने स्पर्धा नवप्रभात हायस्कूल च्या प्रांगणात खेळल्या गेल्या. राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण ११ जिल्ह्यातील १७ वर्षाखालील मुला-मुलीच्या संघाने सहभाग घेतला. ११ मुलाचे व ११ मुलीचे संघ याठिकाणी खेळले. याकरिता अ,ब, क असे तीन गट बनविण्यात आले व गटाच्या आखणीप्रमाणे स्पर्धा पार पडल्या. मुलाच्या अंतिम सामना भंडारा विरूद्ध वाशीम तर मुलीचा अंतिम सामना गडचिरोली विरूद्ध वर्धा यात खेळला गेला. अंतिम सामन्यात भंडारा व गडचिरोली जिल्ह्यानी विरूद्ध संघावर विजय मिळविला. दोन दिवसापासून सुरू असलेली कबड्डीचे सामने पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातील क्रीडाप्रेमी तर परिसरातील ग्रामस्थाची मोठ्या संख्येने उपस्थित स्पर्धेत दिसून आली.स्पर्धेकरिता अमृत बारई, प्रमेश नलगोकुलवार, उमाशंकर बडवाईक, मनोज इंगोले, अतुल वाघमारे, सतीश बारई, विकास मारबते, शुभम वाघमारे, विलास बालपांडे, अशोक वर्मा आदी विशेष सहकार्य लाभले.
कबड्डी स्पर्धेत भंडारा व गडचिरोली संघाने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:09 PM
मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे आयोजित ३० व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना २३ सप्टेंबरला नवप्रमात शाळेच्या पटांगणावर पार पडला. यात मुलं गटातून भंडारा जिल्हा तर मुली गटातून गडचिरोली जिल्ह्यान प्रथम क्रमांक पटकावित बाजी मारली.
ठळक मुद्देआमदार चषक कबड्डी स्पर्धा : ११ जिल्ह्यातील संघाचा समावेश, चरण वाघमारे यांच्या हस्ते बक्षीस वितरण