शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

भंडारा व गोंदिया जिल्हा ‘चाटू’ पक्ष्यांचे माहेरघरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 9:34 PM

भंडारा व गोंदिया जिल्हा भात व तलावाचे जिल्हे म्हणून प्रसिध्द आहेत. त्याचप्रमाणे चाटू पक्ष्यांचे माहेरघर म्हणूनही नावलौकीक आहे. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागझीरा व्याघ्र प्रकल्पात या चाटू पक्ष्यांची संख्या सर्वाधिक पाहायला मिळते हे विशेष.

ठळक मुद्देनागझीरा अभयारण्यात मोठी संख्या : निवासी आणि भटके पक्षी म्हणून ओळख

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भंडारा व गोंदिया जिल्हा भात व तलावाचे जिल्हे म्हणून प्रसिध्द आहेत. त्याचप्रमाणे चाटू पक्ष्यांचे माहेरघर म्हणूनही नावलौकीक आहे. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागझीरा व्याघ्र प्रकल्पात या चाटू पक्ष्यांची संख्या सर्वाधिक पाहायला मिळते हे विशेष. जिल्ह्यात तलावाची संख्या अधिक असल्यामुळे अनादीकाळापासून विदेशी पक्षाचे या जिल्ह्यात आगमन आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.संस्कृत भाषेत दर्वितुंड नावाने ओळख असलेल्या या लांब चोचीच्या पक्ष्याला भंडारा जिल्ह्यात चाटू या नावाने ओळखले जाते. या पक्ष्याचे पाय लांब काळे असून त्याची लांबी ६० सेंमी असते. तर याची मान लांब असून चोचीवर नक्षीकामासारखे कोरलेली असते. भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीकांत, म्यानमार आदी देशात या पक्षांची ये-जा चालू असते. म्हणूनच या पक्ष्याला निवासी आणि भटके पक्षी म्हणून ओळखले जाते.सारसासारख्या सरोपराशी नाते असलेला हा पक्षी पांढराशुभ्र असुन सकाळी आणि सायंकाळी चोचीच्या सहाय्याने चिखलातील कीटक, बेडूक यासारख्या पाण्यातील वनस्पती व किटक खातो. दिवसेंदिवस या पक्ष्याची संख्या रोडावत आली आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे विशेष म्हणजे तलावात पाणी असणे गरजेचे ठरले आहे. मात्र दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तलावात पाणी राहत नाही. त्यामुळे विदेशी पाहुण्यांना अन्न व जलतरण करण्यास सोईचे होत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे.मागील आठ दहा वर्षापासून या पक्ष्यांची संख्या रोडावतांना दिसते आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. तलावात पाणी साचत नाही. त्यामुळे पक्षी तलावात येत नाही. तलावांची दुरुस्ती करुन तलावात अधिकाधिक पाणी साठवून राहावे व नैसर्गिक समतोल राहावा. विदेशी पाहुणे या जिल्ह्याची शान आहे व ती अशीच अबाधित राहावी, एवढीच इच्छा आहे.-विनोद भोवते, पक्षी निरीक्षक