शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

भंडारा शहर ठरतेय ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 5:00 AM

आतापर्यंतच्या रुग्णसंख्येपैकी एकट्या भंडारा तालुक्यात १०४९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७५७ रुग्ण फक्त भंडारा शहरात आढळले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्क न वापरणे व आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांना तिलांजली दिली जात असल्याने कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरात ७५७ रुग्ण : जिल्ह्यात आतापर्यंत २१०६ कोरोनाबाधित, सोमवारी १०३ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जाणकारांचा अंदाज खरा ठरत असून दिवसेंगणिक कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यातून भंडारा शहर कोरोना रुग्णांच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१०६ कोरोनाबाधीत आढळले असून त्यापैकी फक्त भंडारा शहरात ७५७ रुग्ण आहेत. यावर आळा घालण्यासाठी पालिका प्रशासन कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे समजते.शनिवारी १३८, रविवारी ११९ तर सोमवारी १०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतच्या रुग्णसंख्येपैकी एकट्या भंडारा तालुक्यात १०४९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७५७ रुग्ण फक्त भंडारा शहरात आढळले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्क न वापरणे व आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांना तिलांजली दिली जात असल्याने कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आजाराबाबत गांभीर्य कमी व भीती जास्त निर्माण केली जात असल्याने आजार ‘कम्युनिटी स्प्रेड’ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्वयंशिस्तता ढासळल्यानेच रुग्णांचे प्रमाण बळावले आहे. परिणामी भंडारा शहर हॉटस्पॉट शहर म्हणून गणले जात आहे. अनलॉक टप्प्यातील प्रक्रिया सुरू होताच नागरिकही मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यातही नियमांना फाटा दिला जात असल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. स्थानिक प्रशासन वारंवार आवाहन करीत असले तरी नागरिक त्याला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी यावर आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून येत्या काही दिवसात कठोर लॉकडाऊन करण्याच्या भूमिकेत आहे.१४ ०९० व्यक्तींची अ‍ॅन्टीजेन तपासणीआरोग्य विभागाच्यावतीने आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १४०९० व्यक्तींची अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे तपासणी करण्यात आली आहे. यात १२ हजार ६६६ व्यक्ती निगेटिव्ह आढळले असून १४२४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत तीव्र श्वासदाहाचे १८२ व्यक्ती फ्युओपीडीमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी ९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. १७३ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आहेत.१२ पालिका कर्मचारी पॉझिटिव्हभंडारा शहर कोरोना रुग्णाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत असताना भंडारा पालिकेतील १२ कर्मचारीही कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. यात पाच अभियंते, तीन बाबू, दोन सफाई कामगार व दोन आरोग्य परिचारिकांचा समावेश आहे. परिणामी पालिकेत ८ व ९ सप्टेंबरला सामान्य नागरिकांसाठी प्रवेशावर प्रतिबंध घातला आहे.सोमवारी १०३ व्यक्ती पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यूसोमवारी जिल्ह्यात १०३ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या २१०६ झाली आहे. सोमवारी भंडारा तालुक्यात ६८, लाखांदूर ८, तुमसर १५, पवनी ११ व लाखनी तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. दरम्यान आज ४३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आतापर्यंत १०१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उपचाराखालील रुग्णांची संख्या १०५३ इतकी आहे. तसेच उपचारार्थ दाखल असलेल्या भंडारा तालुक्यातील एका ४३ वर्षीय महिला व पवनी तालुक्यातील पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या ३७ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या