आज अभियंता दिन : सर्वाधिक अभियंते महावितरणमध्येभंडारा : जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मिळून जिल्ह्यात सव्वादोनशे अभियंते कार्यरत आहेत. यात सर्वाधिक १०९ अभियंते महावितरण विभागात असून ३०० च्या वर अभियंते सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेत कार्यरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात ३२ अभियंत्यांमध्ये कार्यकारी अभियंता, सहा उपविभागीय अभियंते आणि २५ कनिष्ठ अभियंते आहेत. जिल्हा परिषदेत ६० अभियंते कार्यरत असून बांधकाम विभाग, सिंचन विभाग व पाणी पुरवठा विभागाला तीन कार्यकारी अभियंते आहेत. याशिवाय पाच उपविभागीय अभियंते आणि ५२ कनिष्ठ अभियंते आहेत. महावितरण कंपनीमध्ये १०९ अभियंत्यांमध्ये अधीक्षक अभियंता यांच्यासह चार कार्यकारी अभियंते, सहा सहाय्यक कार्यकारी अभियंते, १७ उपविभागीय अभियंते, ५० सहाय्यक अभियंते, २४ कनिष्ठ अभियंते यांच्यासह एक प्रणाली विश्लेषक, एक प्रक्रिया योजक व पाच सहाय्यक प्रक्रिया योजक आहेत. महापारेषण मध्ये १४ अभियंत्यांमध्ये कार्यकारी अभियंता, चार सहाय्यक कार्यकारी अभियंता, सात उपविभागीय अभियंते, सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता प्रत्येकी एक आहेत. (नगर प्रतिनिधी)
२२५ अभियंत्यांवर भंडारा जिल्ह्याची धुरा
By admin | Published: September 15, 2015 12:34 AM