नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष प्रा.डॉ सुधीर अग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या व ऑनलाईन गुगल मीटच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल यांनी घोषित केली. त्यात, भंडारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रा.रवी वाहने,भंडारा, प्रा.संतोष सव्वालाखे,सिहोरा ,प्रा.युवराज खोब्रागडे पालादुर, प्रा.राजेश भालेराव साकोली,तर सहसचिव म्हणून प्रा.नरेश मोटघरे मोहाडी, प्रा.उत्तम बनवाडे लाखांदूर,प्रा. सुजाता अवचार,पवनी, तर महिला प्रमुख म्हणून प्रा. अश्विनी तिरपुडे, तुमसर ,महिला सहप्रमुख प्रा. रेखा क्षीरसागर भंडारा,कोषाध्यक्ष म्हणून प्रा. प्रेमानंद आगाशे करडी, प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रा.मोहन भोयर तुमसर,कार्यालय प्रमुख प्रा.प्रवीण वंजारी तर कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा.पद्मजा कुलकर्णी, प्रा.रामकृष्ण लांजे, प्रा.नवीन मालावर, प्रा.जयदेव चौधरी, प्रा.दीनदयाळ दमाहे, प्रा.ज्ञानेश्वर मेंढे, प्रा.सारिका मंदाडे, प्रा.रमेश नागरारे, प्रा.अनिल गहाने, प्रा.स्वाती पडोळे, प्रा.के.वाय. सोनवणे, प्रा.प्रतिमा बनसोड, प्रा. चांद्रकिरण साखरे, प्रा.जगन माकडे, प्रा.संतोष काठाने, प्रा.जागेश्वर लांजे, प्रा.चंद्रशेखर झळके यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील राज्यशात्र विषयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका प्रा.डॉ श्रुती मेहता यांनी सर्व प्राध्यापकांनी परिषदेच्या बॅनरखाली एकत्रित येऊन आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक समस्या सोडविण्याकरिता संघटित होणे आवश्यक आहे असे आवाहन केले. या प्रसंगी राज्यशात्र परिषदेचे राज्य सचिव प्रा.डॉ. पितांबर उरकुडे यांनी परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी राज्यशात्र परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा.शरद जोगी उपस्थित होते.
संचालन प्रा. प्रमोद कारेमोरे यांनी केले. परिचय प्रा. संध्या येलेकर यांनी तर प्रास्ताविक प्रा.चंद्रशेखर गिरडे यांनी व आभार प्रदर्शन प्रा. किशोर बुरबुरे यांनी केले.