ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाशी दोन हात करीत पिकविलेला धान आधारभूत केंद्रावर विकला, मात्र आता महिना झाला तरी धान विक्रीचा एक छदामही शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. भंडारा जिल्ह्यातील आठ हजार ७६ शेतकऱ्यांनी दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची विक्री केली असून त्याची किमत ५२ कोटी ७४ लाख ६१ हजार ३४३ रुपये आहे. आपल्या खात्यात धान विक्रीचे पैसे कधी जमा होतात याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.भंडारा जिल्ह्यात ६६ आधारभूत धान खरेदी केंद्रावर १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आधारभूत केंद्रावर आपला धान आणून विकला. मात्र अद्यापही जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यांला धान विक्रीचे पैसे मिळाले नाहीत. आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर घरी आलेला धान विकला. परंतु आता त्यांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. भंडारा तालुक्यातील २९१ शेतकऱ्यांना नऊ हजार ५६४ क्विंटल धान विकला असून त्याची रक्कम एक कोटी ७३ लाख ५८ हजार ६०० रुपये आहे. मोहाडी तालुक्यातील एक हजार ८४ शेतकऱ्यांनी ३५ हजार ८९१ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत सहा कोटी ५१ लाख ४२ हजार ८२८ रुपये, तुमसर तालुक्यातील एक हजार ५९० शेतकऱ्यांनी ५४ हजार ९४७ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत नऊ कोटी ९७ लाख ३० हजार ७५ रुपये, लाखनी तालुक्यातील एक हजार ७६१ शेतकऱ्यांनी ६२ हजार ४७२ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत ११ कोटी ३३ लाख ८७ हजार २२४ रुपये, साकोली तालुक्यातील एक हजार ४५९ शेतकऱ्यांनी विकलेल्या ५२ हजार ८६९ क्विंटल धानाचे नऊ कोटी ५९ लाख ५७ हजार ५९८ रुपये, लाखांदूर तालुक्यातील एक हजार १५६ शेतकऱ्यांनी ४६ हजार २४५ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत आठ कोटी ३९ लाख ३७ हजार २१६ रुपये आहे. पवनी तालुक्यातील ७३५ शेतकऱ्यांनी २८ हजार २६१ क्विंटल धान आधारभूत केंद्रावर विकला असून पाच कोटी १९ लाख ४७ हजार ८४१ रुपये किंमत होते. २ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धान विकला आहे.गत महिनाभरापासून शेतकरी आधारभूत खरेदी केंद्रावर धान विकत आहेत. मात्र अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले असून नवीन अधिकारी रूजू झाले. परंतु त्यानंतरही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. शेतकरी पैशाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.६६ केंद्रावर केवळ सर्वसाधारण धानाची खरेदीजिल्ह्यातील ६६ आधारभूत धान खरेदी केंद्रावर केवळ सर्वसाधारण धानाचीच शेतकरी विक्री करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील एकाही केंद्रावर अ ग्रेडचे धान विक्रीस आले नाही. अ ग्रेडच्या धानाला खुल्या बाजारात आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकरी शासकीय खरेदीकडे पाठ फिरवित असल्याचे दिसत आहे. त्यातही वेळेवर पैसा मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
भंडारा जिल्ह्यात धानाचे ५२ कोटी ७४ लाखांचे चुकारे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 6:00 AM
भंडारा जिल्ह्यातील आठ हजार ७६ शेतकऱ्यांनी दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची विक्री केली. आपल्या खात्यात धान विक्रीचे पैसे कधी जमा होतात याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल भंडारा जिल्ह्यात दोन लाख ९० हजार क्विंटल धान विक्री