शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

यू-डायस प्लसच्या कामात भंडारा जिल्हा प्रथमस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:33 AM

आधार कार्ड क्रमांकाप्रमाणेच आता एकाच क्रमांकावर विद्यार्थ्याची आणि शाळांची शैक्षणिक माहिती यू-डायसवर उपलब्ध झाली आहे. याच क्रमांकावरून राज्यातील ...

आधार कार्ड क्रमांकाप्रमाणेच आता एकाच क्रमांकावर विद्यार्थ्याची आणि शाळांची शैक्षणिक माहिती यू-डायसवर उपलब्ध झाली आहे. याच क्रमांकावरून राज्यातील कोणत्याही शाळेची आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एका क्लिकवर पाहता येते. यू-डायस प्लसवर २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षाची माहिती शाळांना अपलोड करायची. ही माहिती अपलोड करण्याच्या कामात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावर चंद्रपूर जिल्हा, तर तिसरे स्थान गोंदिया जिल्ह्याचा आहे. राज्यात विदर्भातील पहिल्या तीनमध्ये राज्याच्या टोकावरील जिल्हे आहेत. भंडारा जिल्ह्यात १३२४ शाळा आहेत. त्यांपैकी सर्वच शाळांनी यू-डायस प्लसवर माहिती भरली आहे. भंडारा जिल्ह्याचे काम १०० टक्के झाला आहे. मुख्याध्यापकांनी यू-डायस प्लसवर भरलेली माहिती २८ मेपर्यंत तपासून घेता येईल. त्यात दुरुस्ती करता येईल. त्यानंतर माहिती अंतिम केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषद भंडाराचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनोहर बारस्कर यांनी दिली. यू-डायस या प्रणालीमुळे विद्यार्थ्याने शाळा बदलली तरीही त्याची शैक्षणिक माहिती केवळ कोड नंबरवरून ट्रान्स्फर होऊ शकते. तसेच प्रत्येक शाळेलाही ‘यू-डायस' कोड नंबर दिलेला आहे. या कोडवरून राज्यातील कोणत्याही शाळेची माहिती इंटरनेटवर पाहता येणे शक्य आहे. बनावट पटसंख्येला चाप बसण्यासाठी शिक्षणक्षेत्रात चर्चित असलेल्या ‘यू-डायस’ या डिजिटल सिस्टीमची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील प्रत्येक शाळेला आणि तेथील विद्यार्थ्यांना विशिष्ट कोड नंबर दिलेले आहेत. या कोड नंबरवरून त्यांची माहिती मंत्रालयातील सचिव एका क्‍लिकवर पाहू शकतात. ‘स्टुडंट आयडेंटिफिकेशन नंबर’ आणि ‘युनिफाईड डिस्ट्रिक्‍ट इन्फॉर्मेशन फॉर एज्युकेशन’ (यू-डायस) अशी त्यांची नावे आहेत.

शाळांना अकरा अंकी कोड नंबर दिलेला आहे. यातील पहिले दोन आकडे म्हणजे जिल्ह्याचा कोड नंबर आहे. त्यानंतरचे दोन आकडे म्हणजे तालुक्‍याचा कोड नंबर आहे. त्यानंतरचे आकडे हे शाळेचे कोड नंबर आहेत. त्यानंतर पुढे विद्यार्थ्याचा क्रमांक आहे. एखादा विद्यार्थी कोणत्या शाळेत, कोणत्या वर्गात शिकत आहे. यापूर्वी तो कोणत्या शाळेत होता, तेथे त्याची प्रगती काय होत, याची माहिती या कोडवरून मिळू शकते. प्रत्येक शाळेला ‘यू-डायस’ या पद्धतीने कोड दिलेले आहेत. त्या कोडवर त्यांच्या शाळेतील पटसंख्येसह इतर माहिती उपलब्ध आहे. प्रत्येक शाळेने ही माहिती संगणकावरून अपडेट केली आहे.