गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा: जिल्ह्यात रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. पावसासोबत आलेल्या वादळामुळे काही ठिकाणी झाडेही पडली. शेतीचेही मोठे नुकसान झाले.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार, अधरा तासाच्या काळात २० ते ३० मिमी पाऊस पडला. काही ठिकाणी १० मिनीटे ते अर्धा तास असा पाऊस झाला. भंडरा, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर या तालुक्यांमध्ये गारांचा पाऊस झाला. पवनीसह लाखांदूर तालुक्याच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या मका, गहू, हरभरा या पिकांचेही नुकसान झाले. विशेषतः पपई आणि केळीच्या बागांनाही मोठा फटका बसला.