भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर कुकडे यांना ३५ हजार १९४ मतांची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:42 PM2018-05-31T15:42:54+5:302018-05-31T15:43:06+5:30
राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १७ व्या फेरीत २ लाख ९४ हजार ६०९ मते मिळवून २७,२०६ एवढ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/ गोंदिया:
भंडारा- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे मतमोजणीच्या १७ व्या फेरीत २ लाख ९४ हजार ६०९ मते मिळवून २७,२०६ एवढ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. तर भाजपाचे हेमंत पटले यांना २ लाख ५९ हजार ४१२ मते मिळाली आहेत. मतदानाच्या १६ व्या फेरीनंतरचे हे चित्र भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयाचे चित्र स्पष्ट करणारे असल्याचे जाणकारांचे मत आहे.
नाना पटोले यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यावर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. दरम्यान, ईव्हीएममधील बिघाडामुळे बुधवारी (३0 मे) भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील ४९ बुथवर फेरमतदान घेण्यात आले. यावेळेस, गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले, असा ठपका ठेऊन त्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी, असेही आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने काळे यांची लगेच बदलीही केली. मात्र, काळे यांच्याकडून कर्तव्यात काय कसूर झाली, हे मात्र आयोगानं स्पष्ट केलेले नाही.