लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: १९५२ च्या लोकसभा निवडणुकीपासून भंडारा-गोंदिया मतदारसंघ अस्तित्वात आला. पांरपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदार संघावर सातत्याने काँग्रेस व राष्टष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या मतदार संघात भाजपाने चार वेळा काँग्रेसला दणका दिला आहे. यात १९८९,१९९९,२००४ आणि २०१४ मध्ये हा मतदार संघ भाजपाने आपल्याकडे खेचून घेतला होता. या मतदार संघातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने १३ वेळा आपला खासदार लोसभेत पाठविला आहे. या शिवाय १९७७ मध्ये लक्ष्मणराव मानकर यांनी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या मतदार संघातून प्रफुल्ल पटेल यांनी चार वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. तर केशवराव पारधी व रामचंद्र हाजरणवीस यांनी दोनदा प्रतिनिधीत्व केले आहे. १९८९ मध्ये डॉ.खुशाल बोपचे, १९९९ मध्ये चुन्नीलाल ठाकूर, २००४ मध्ये शिशुपाल पटले व २०१४ मध्ये नाना पटोले हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र नाना पटोले यांनी २०१८ मध्ये खासदार पदाचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला. त्यानंतर या मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात आली.यात राष्टÑवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे निवडून आले.महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघाच्या रचनेनुसार अनुक्रमे अकरावा येणारा मतदार संघ म्हणजे, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ. या मतदार संघात गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, भंडारा, साकोली, तुमसर या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मतदार संघाच्या पुनर्रचनेपूर्वी देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचा याच मतदार संघात समावेश होता.मात्र पुनर्रचनेत देवरी-आमगाव मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आला.
जातीय समीकरणावर निवडणुकाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात पूर्वीपासूनच जातीय समीकरणाचा पगडा राहिला आहे.या मतदार संघात सर्वाधिक मतदार कुणबी व पोवार समाजाचे आहे. त्यामुळे या दोन समाजाच्या मतांच्या समीकरणावर उमेदवाराच्या विजयाचे समीकरण बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. त्यासाठीच सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी देताना या दोन समाजाच्या उमेदवारांचा प्राधान्याने विचार केला जातो.
महिला उमेदवाराला प्रतिनिधीत्व नाहीभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात आत्तापर्यंत झालेल्या सर्व लोकसभेच्या निवडणुकांवर नजर टाकली असता या मतदार संघातून आत्तापर्यंत महिला उमेदवारांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी महिलांना अद्याप मिळाली नाही.मात्र यंदा प्रथमच या मतदार संघातून महिला उमेदवाराला प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिला उमेदवार निवडून आल्यास या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या त्या पहिला महिला खासदार ठरणार आहेत.
दिग्गजांना पराभवाची धूळ चाखणार मतदार संघभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.श्रीकांत जिचकार व प्रफुल्ल पटेल या दिग्गज उमेदवारांचा या मतदार संघातील मतदारांनी पराभव केल होता. त्यामुळे या मतदार संघाला इतिहास देखील आहे.