शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

भंडारा पंचायत समिती वाऱ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:06 AM

देवानंद नंदेश्वर।आॅनलाईन लोकमतभंडारा : तालुक्यातील रहिवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त अशा मिनी मंत्रालयाची उभारणी करण्यात आली. मात्र एखाद्या शसाकीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्यास तेथील बहुतेक कर्मचारी आपल्या खुर्चीवर आढळत नाही, त्यामुळे शासकीय कामाचा खोळंबा होतो, ही बाब ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आली.भंडारा पंचायत समितीतील कार्यालयाचा कारभार कसा चालतो, याची प्रत्यक्ष ...

ठळक मुद्देकामाचा खोळंबा : आस्थापना विभागाशिवाय अन्य विभागात ठणठणाट

देवानंद नंदेश्वर।आॅनलाईन लोकमतभंडारा : तालुक्यातील रहिवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त अशा मिनी मंत्रालयाची उभारणी करण्यात आली. मात्र एखाद्या शसाकीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्यास तेथील बहुतेक कर्मचारी आपल्या खुर्चीवर आढळत नाही, त्यामुळे शासकीय कामाचा खोळंबा होतो, ही बाब ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आली.भंडारा पंचायत समितीतील कार्यालयाचा कारभार कसा चालतो, याची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी सदर प्रतिनिधीने पंचायत समिती कार्यालयाचा फेरफटका मारला असता. बहुतेक कर्मचारी टेबलवरुन बेपत्ता असल्याचे दिसून आले. या पंचायत समितीअंतर्गत एकूण ९४ ग्रामपंचायती आहेत. संबंधित गावातील नागरिक आपली कामे घेऊन येथे येतात. परंतु कर्मचारी कामावर उपस्थित असून सुद्धा ते आपल्या टेबलवर दिसत नाहीत. दिवसभर प्रतीक्षा करूनही त्यांना काम न होता निघून जावे लागते. पंचायत समिती अंतर्गत बांधकाम, आरोग्य, कृषी, शिक्षण यासारखे विभाग आहेत. ग्रामीण भागातून येणाºया नागरिकाला अकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.सदर प्रतिनिधीने पंचायत समिती कार्यालयाचा दुपारी १ वाजताच्या सुमारास फेरफटका मारला असता सभापती व उपसभापती कक्ष रिकामे होते. सभापती प्रल्हाद भुरे व उपसभापती ललीत बोंद्रे हे पशुप्रदर्शनीला गेल्याचे सांगण्यात आले. गटविकास अधिकारी कक्षात पाहणी केली असता गटविकास अधिकारी अधिकारी खुर्चीवर दिसून आले नाही. शिक्षण विभाग कक्षात तीन महिला कर्मचारी उपस्थित होत्या. लेखा विभागात दोन पुरुष कर्मचाºयांची उपस्थिती होती. सहायक गटविकास अधिकारी कक्षातील खुर्ची अधिकाºयाविना रिकामी होती. पशुसंवर्धन विभागाचे कक्ष कुलूपबंद होते. बांधकाम विभाग कक्षात दोन अभियंते हजर होते. आस्थापना विभागात सर्वाधिक अधिकारी व कर्मचाºयांची ९९ टक्के हजेरी दिसून आली. कृषी विभाग कक्ष व सांख्यिकी विभागात प्रत्येकी दोन कर्मचारी उपस्थित होते. याबाबत उपस्थित अधिकाºयाला विचारले असता, अनेक कर्मचारी बाहेर काम आहे, असे सांगून निघून जातात. वरिष्ठ अधिकारी कुणाकुणाकडे लक्ष देणार, ज्यांचे त्यांना कळाले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.खंडविकास अधिकारीपद प्रभारीवरभंडारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नुतन सावंत या प्रसुती रजेवर गेल्यामुळे त्यांचा प्रभार सत्येंद्र तामगाडगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रभार असताना त्यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील असतात, असेही चर्चेदरम्यान सांगण्यात आले.दौऱ्याच्या नावाखाली कार्यालयाला दांडीपंचायत समितीमध्ये महत्त्वाचे प्रभाग म्हणजे कृषी, पंचायत, बांधकाम, शिक्षण, रोजगार हमी, बालविकास प्रकल्प, आरोग्य असे महत्त्वाचे प्रभाग आहे. या प्रभागातील अधिकारी ग्रामीण भागाच्या जनजागृतीसाठी दौरे काढतात. त्याचाच फायदा घेऊन कर्मचारी कार्यालयाला दांडी मारतात. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांची दमछाक होत असल्याचे दिसून आले आहे.मानेगाव (बाजार) येथे आयोजित पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्यात उपस्थितीमुळे दुपारच्या सुमारास कार्यालयात नव्हतो. पंचायत समितीतील बरेच अधिकारी- कर्मचारी दोन दिवसांपासून रमाई आवास योजनेची तपासणीसाठी तालुक्यातील गावांना भेटी देण्यासाठी गेले आहे. ग्रामस्थांना अडचण निर्माण होऊ नये, त्यासाठी व्यवस्था केली आहे.-सत्येंद्र तामगाडगे, गटविकास अधिकारी, पं.स.भंडारा.पंचायत समितीत अनेकदा अधिकारी-कर्मचारी खुर्चीवर उपस्थित राहत नसल्यामुळे कामाचा खोळंबा होतो. ग्रामीण भागातील नागरीकांना त्रास होऊ नये म्हणून यापुर्वी अनेकदा अधिकाºयांना सांगण्यात आले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.-टेकराम पडोळे, सदस्य, पंचायत समिती, भंडारा