शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

Bhandara: अश्लिलतेचा कळस, नृत्यांगनेचे जोडीदारासोबत निर्वस्त्र नृत्य:आयोजकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 6:59 PM

Bhandara News: तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नाकाडोंगरी या आंतरराज्य मार्गावरील गावात मंडईनिमित्त आयोजित डान्स हंगामा नृत्याच्या कार्यक्रमात एका नर्तकीने चक्क निर्वस्त्र होत सहकाऱ्यासोबत नृत्य केल्याचा प्रकार घडला.

- मोहन भोयरतुमसर - तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नाकाडोंगरी या आंतरराज्य मार्गावरील गावात मंडईनिमित्त आयोजित डान्स हंगामा नृत्याच्या कार्यक्रमात एका नर्तकीने चक्क निर्वस्त्र होत सहकाऱ्यासोबत नृत्य केल्याचा प्रकार घडला. १८ नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास हे नृत्य झाल्याची माहिती पुढे आली आहे. या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर गोबरवाही पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे नोंदविण्याची तयारी चालविली आहे.

तुमसर-वाराशिवणी या आंतरराज्य महामार्गावर नाकाडोंगरी येथे मंडईनिमित्त डान्स हंगामा हा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यात एका नर्तकीने ग्रुप मधील एका युवकासोबत अश्लील नृत्य केले. नृत्यात युवक व नर्तकी अतिशय अश्लील व किळसवाणा प्रकार करताना दिसत आहेत. नृत्यादरम्यान युवती स्वतःच आपल्या शरीरावरील कपडे काढताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. नृत्यांमध्ये ते दोघेही इतके बेधुंद झाले की शेवटी ते स्टेजवरून खाली पडले. नृत्यादरम्यान प्रेक्षकही स्टेजवर मोठ्या संख्येने बसलेले दिसत आहेत. एवढेच नाही तर नोटांचे बक्षीस देतानाही दिसत आहेत. कार्यक्रम बघण्याकरिता मध्य प्रदेशातील पुढारीही आले होते, अशी माहिती आहे.

रात्री १० वाजताच्या दरम्यान हा डान्स हंगामा सुरू झाला. अश्लिलता वाढातला लागल्यावर बारा वाजतानंतर महिला प्रेक्षक निघून गेल्यानंतर हे अश्लील नृत्य झाले, अशी माहिती आहे.

कर्तव्यावर नव्हते पोलिसगोबरवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाडोंगरी गाव येते. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. त्याकरिता दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. परंतु रात्री हे दोन्ही पोलिस कार्यक्रम संपण्यापूर्वीच निघून गेले, त्यानंतर हे अश्लील नृत्य येथे झाल्याची माहिती आहे. या पोलिसांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती आहे.

गोबरवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलया प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेऊन आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची चौकशी गोबरवाहीचे पोलिस निरीक्षक नितीन मदनकर, तुमसरचे पोलिस निरीक्षक निलेश ब्राह्मणे करीत आहेत. मंगळवारी दुपारी भंडारा विभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी गोबरवाही पोलिस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची माहिती जाणून घेतली. युवतीने स्वतः तो प्रकार केला की तिला असा प्रकार करण्यास कोणी बाध्य केले होते काय याचा तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र