शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

भंडारा पोलिसांचा ‘टेक एक्स्पो’

By admin | Published: March 27, 2016 12:21 AM

जिल्हा पोलीस दलातर्फे सायबर गुन्हेगारी व त्याबाबत जनजागृती, पोलीस मित्र मेळावा आणि आंतरराष्ट्रीय नागरिक सुरक्षा प्रतिसाद..

माहितीचा भंडार : विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाभभंडारा : जिल्हा पोलीस दलातर्फे सायबर गुन्हेगारी व त्याबाबत जनजागृती, पोलीस मित्र मेळावा आणि आंतरराष्ट्रीय नागरिक सुरक्षा प्रतिसाद या अ‍ॅपचे सर्वसामान्य जनतेसाठी लाँचींगचे आयोजन बुधवारी, पोलीस मुख्यालय येथील परेड ग्राऊंडवर करण्यात आले.उद्घाटन नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार रामचंद्र अवसरे उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, राकेश जैन आदी उपस्थित होते.या टेक एक्स्पो मध्ये फॉरेन्सिक सायंटीफिक लॅब नागपूर या लॅबतर्फे सर्वसामान्य जनतेला गुन्ह्याच्या घटनास्थळी परिस्थितीजन्य पुरावा हा जसा आहे तसाच ठेवावा, त्याचे महत्व सांगून गुन्हेगारास शिक्षा होण्यास तो कसा महत्वाचा पुरावा आहे याबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी यांना घटनास्थळावरून पुरावा कसा गोळा करावा याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.इंस्टीट्युट आॅफ फॉरेन्सिक सायंटिफीक नागपूर ही संस्था ही या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते व त्यांनी प्रदर्शनामध्ये क्राईम सीन तयार करून लोकांना प्रात्यक्षिक दाखविले. गोळी मारली तर काय करावे व त्याचा तपास कसा करावा, याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी देखावा तयार करून सादर केले. नकली नोटा हे अल्ट्रा व्हॉयलट लाईटद्वारे कशा ओळखाव्या, नकली नोटांची ओळख तसेच फेक पासपोर्ट कसा ओळखावा याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.रक्षक सुरक्षा नागपूर या संस्थेने सर्वसामान्य जनमानसांनी मालमत्तेची व जिवाची सुरक्षा कशी करावी याबाबत विविध उपकरणांचे प्रदर्शन लावले होते. यामध्ये थेफ्ट अलार्म गार्ड, टू व्हीलरवर थेफ्ट अलार्म तसेच लोकं बाहेरगावी गेल्यावर सीसीटीव्हीद्वारे घ्यावयाची काळजी व गावी गेल्यावर चोऱ्या होवू नये व घरात चोर घुसल्यास तो कसा पकडल्या जाईल याबाबत उपलब्ध असलेल्या उपकरणांची माहिती दिली.पांडव इंजिनियरिंग कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे मॉडेल तयार करून भविष्यात वाहतूक नियमन कसे करता येईल त्याचे मॉडेल तयार केले. सिग्नलवर एखाद्या लेनमध्ये जास्त ट्रॉफीक झाला असेल व दुसऱ्या लेनमध्ये ट्रॉफीक नसेल तर जास्त ट्रॉफीक असलेल्या लेनमध्ये ग्रीन सिग्नल अ‍ॅटोमेटीक जनरेट होवून ट्रॉफीक सुरळीत करण्याचे मॉडेल दर्शविले. सोलर एनर्जीवर कुलर कसा चालेल याचे मॉडेल प्रदर्शीत केले. घरामध्ये चोरी होऊ नये म्हणून सेंसर अलार्म सिस्टीम सुद्धा तयार केली व चोर चोरी करून गेल्यानंतरही त्याला कसे पकडता येईल याबाबत उत्कृष्ट मॉडेल तयार केले. सायबर सेफ्टी टिप्स आणि ड्रोन या संस्थेने ड्रोनचे महत्व सांगून त्याचा उपयोग सांगितला. ड्रोन म्हणजे पायलट रहित विमान जे की, ज्याच्या आधारे नक्षल भागामध्ये ड्रोनचे सहाय्याने एरियल सर्व्हे करून आजूबाजूच्या परिसरात नलक्षवादी आहेत किंवा नाही कसे याचा शोध घेता येईल. सदरचे मॉडेल हे किट्स कॉलेज रामटेकच्या विद्यार्थ्यांनी तयार केले होते. अ‍ॅक्सीस बँक व नेट बँकींग सुरक्षा यांनी नेट बँकींग सुरक्षेबाबत बॅनर लावून माहिती दिली. असर फाऊंडेशन या पथकाने पथनाट्यद्वारा अ‍ॅप लाँचिंग व एटीएम फ्रॉडबाबत नाट्य सादर केले.पोलीस विभागातर्फे आर्म अ‍ॅम्युनेशन पथक, बाँब शोधक नाशक पथक, वाहतूक नियंत्रण शाखा, एन.डी.पी.एस. सेल, सायबर क्राईम सेल, फिंगर प्रिंट विभाग, महिला समुपदेशन केन्द्र, वायरलेस विभाग, मोटार परिवहन विभाग, अँटी नक्षल विभाग तसेच मॉडेल पोलीस स्टेशन दाखविण्यात आले.टेक एक्स्पो दरम्यान भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय नागरिक सुरक्षा प्रतिसाद या अ‍ॅपचे लाँचिंग करण्यात आले. सिटीझन कॉप आणि प्रतिसाद या दोन्ही अ‍ॅपद्वारे कोणी इसम अडचणीत असल्यास त्याने या अ‍ॅपवरून मदतीची मागणी केल्यास त्याला तात्काळ मदत पुरविण्याची उपाययोजना पोलिसांनी केलेली आहे. भविष्यात ही अ‍ॅप जनतेला मदतदायी होवू शकेल.समारोप कार्यक्रमाला टेक एक्स्पोमध्ये भाग घेणाऱ्या सर्व संस्थांना पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरवान्वित करण्यात आले. संचालन परीविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी केले. कार्यक्रमाकरिता प्रभारी पोलीस उपअधीक्षक किरण धात्रक, पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर, आनंद रावराने, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंदुलकर, राखीव पोलीस निरीक्षक लोळे, म.स.पो.नि. तोडासे तसेच त्यांचे अधिनस्थ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(नगर प्रतिनिधी)