लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज सोमवारला श्रीगणेश हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमत वृत्तपत्र समूह व आयुष ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.प्रारंभी बाबुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिबिराचे उद्घाटन श्री गणेश शाळेचे संचालक पद्माकर मोघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सारंग महांकाळ, आयुष ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रवीराज भांगे, स्वाती महांकाळ, साक्षी वांदिले, योगेश पडोळे, प्रथम रक्तदाते प्रशांत भोले व इंद्रपाल कटकवार, जिल्हा प्रतिनिधी नंदू परसावार, लोकमतचे शाखा व्यवस्थापक मोहन धवड उपस्थित होते.दरम्यान, भंडारा जिल्हा लोकमत कार्यालयात बाबुजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष दिलीप बावनकर, देवानंद नंदेश्वर व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.रक्तदात्यांमध्ये प्रशांत भोले, इंद्रपाल कटकवार, मनोज हटवार, भय्यासिंग ठाकूर, ज्ञानेश्वर खोब्रागडे, संतोष पुडके, सचिन वासनिक, विजय ढोमणे, राहूल ढोमणे, नितीन डोंगरे, राजेंद्र राखडे, मयुर रामटेके, दिलीप लेपसे, नितीन टंडन, उमेश लांजेवार, चंद्रकांत मेहर, उत्कर्ष शहारे, श्रद्धा डोंगरे, प्रेरणा सिंगनजुडे, विनोद भगत आदींनी स्वच्छेने रक्तदान केले.यावेळी आयुश ब्लड बँकेकडून प्रत्येक रक्तदात्याला रक्तदाता कार्ड, टी-शर्ट, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संचालन कार्यक्रम संयोजक ललित घाटबांधे यांनी तर आभार सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी आयुष ब्लड बँकेचे कर्मचारी, अनिरूद्ध उपासना केंद्र भंडारा, आयुष ब्लड बँक टीमचे वैशाली सोनटक्के, राणी कुकडे, जितेंद्र रंगारी, ज्योत्सना, करूणा, राजू, रमेश सेलोकर, लायन्स क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले.
स्वेच्छा रक्तदानासाठी सरसावले भंडारावासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 11:14 PM
‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज सोमवारला श्रीगणेश हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमत वृत्तपत्र समूह व आयुष ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
ठळक मुद्देनिमित्त बाबुजींच्या जयंतीचे : सखींनी केले स्वेच्छा रक्तदान