भंडारा: दुचाकीची चावीन दिल्यानं मुलानं वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली आहे. वडिलांची हत्या केल्यानंतर मुलानं पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. त्याला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातल्या केशलवाडा वाघ गावात राहणाऱ्या 21 वर्षीय लोकेश टिचकुलेचे वडिलांसोबत वारंवार वाद व्हायचे. आज वडील ताराचंद टिचकुले शेतावरुन परतल्यानंतर लोकेशनं त्यांच्याकडे दुचाकीची चावी मागितली. मात्र वडिलांनी चावी देण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. ताराचंद यांनी लोकेशला काठीनं मारहाण केली. याचा राग आल्यानं लोकेशनं त्याच काठीनं वडिलांवर हल्ला चढवला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर लोकेशनं पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं.
धक्कादायक! दुचाकीची चावी न दिल्यानं मुलानं केली वडिलांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 9:44 AM
वडिलांच्या हत्येनंतर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
ठळक मुद्देवाद घालणाऱ्या मुलाला वडिलांची काठीनं मारहाणमुलानं काठीनं केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यूवडिलांच्या हत्येनंतर मुलाचं पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण