शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

हल्ल्याच्या निषेधार्थ भंडारा स्वयंस्फूर्त बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 10:24 PM

भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला भंडारा जिल्ह्यात स्वंयस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ : भीमा कोरेगाव हल्ल्याचे भंडारा जिल्ह्यातही पडसाद, साकोलीत महामार्ग रोखला

आॅनलाईन लोकमतभंडारा : भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला भंडारा जिल्ह्यात स्वंयस्फूर्त प्रतिसाद मिळाला. भंडारा शहरासह जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर आणि पवनी या तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. बसेस बंद करण्यात आल्यामुळे एसटी आगारात जमा करण्यात आले होते. सर्वच तहसील कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आल्या. काही ठिकाणी टायर जाळपोळ शिवाय अन्यत्र कुठलिही अनुचित घटना घडली नाही. वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांना बंदचा फटका बसला.भंडारा शहरात आंबेडकरी कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्रिमूर्ती चौकात विविध संघटना एकत्रित येऊन निषेध सभा घेतली. काही शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली नव्हती. त्यामुळे तणावाची स्थिती लक्षात घेऊन तासाभरात शाळा बंद करण्यात आली. एसटी बंद राहिल्याने भंडारा बसस्थानकावर प्रवासी अडकून पडले होते. आंबेडकरी जनतेने भंडारा शहरात घोषणा देत मोर्चा काढला.लाखांदुरात टायर जाळलेलाखांदूर : सकाळपासून आंबेडकरी जनतेने मोर्चात सहभाग घेऊन पिंपळगाव (कोहळी) येथे अर्जुनी मार्गावर टायर जाळून रास्ता रोको केला. दिघोरी मोठी येथे बंद शांततेत पार पडला. निषेध मोर्चाची सुरूवात डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकापासून करण्यात आली. या मोर्चाचा समारोप टी पॉइंटवर तलाठ्यांना निवेदन देऊन करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व हंसराज रामटेके, मधुकर अंबादे, रोशन नंदेश्वर, धम्मदीप साखरे, हरिश भैसारे, मनसुख वालेद, शिवनंदन राऊत, परमानंद शहारे, सिंधू रामटेके, इंदू बारसागडे सहभागी होते. मासळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. निषेध मोर्चामध्ये विनोद भुते, संगीता मेश्राम, निखील मेश्राम, भैय्यालाल गोंडाणे, मिथून पेलने, राष्ट्रपाल हुमणे, छाया लोणारे, चंद्रकला गोंडाणे सहभागी होते.साकोलीत रास्ता रोकोसाकोली : येथे नगर परिषदेसमोर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चेकºयांनी राष्ट्रीय महामार्ग अडविला होता. यावेळी शिवकुमार गणवीर, कैलाश गेडाम, विकास मेश्राम, जि.प.सदस्य नेपाल रंगारी, नगराध्यक्ष धनवंता राऊत, राकेश भास्कर, निकेत घरडे, शब्बीर पठाण, अ.शि. रंगारी, अ‍ॅड.खोब्रागडे, रमेश हरडे, कौशल्या नंदेश्वर, शालू नंदेश्वर यांच्यासह आंबेडकरी बांधव उपस्थित होते. सानगडीत बंदचे नेतृत्व चुन्नीलाल वासनिक, नरेश बेलेकर, केवलचंद कुडवे, जि.प.सदस्या रेखा वासनिक, सुरेखा मेश्राम, पौर्णिमा बेलेकर यांनी केले. बाम्पेवाडा येथे सरपंच नैना चांदेवार, यशवंत कठाणे, कुंभलकर, जांभुळकर, वघारे, रेखा रामटेके, हरिदास बांबोडे, प्रमोद गजभिये, मुकेश गणवीर, दिलीप इलमकर, भागवत जांभुळकर, चुडामन मडामे, माणिक मडामे, आनंदराव शहारे, मडामे यांच्यासह समता सैनिक दलाच्या सदस्य रॅलीत सहभागी झाले होते. वांगी व गोंडउमरी, चांदोरी, उसगाव, सोनेगाव, पळसपाणी, किन्ही येथे रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत केदार नाकाडे, कमलेश मडकवार, आशिष ठाकरे, राहुल ठोणे कार्यकर्ते सहभागी होते.तुमसरात बंदतुमसर : बंदमुळे तुमसरात सकाळपासून एस.टी. बंद होती. एसटीचे ३ ते ४ लाखांचे उत्पन्न बुडाले. तुमसर आगारात ७१ बसगाड्या उभ्या होत्या. सकाळी तुमसर आगारातून तिरोडा, गोंदिया, भंडारा, नागपूरकरिता बसगाड्या रवाना करण्यात आली. ११ वाजतानंतर बसफेºया बंद करण्यात आल्या. वरिष्ठांच्या आदेशानंतरच बसेस सुरु करण्यात येतील, असे आगारप्रमुख ए.एच. आमनेरकर यांनी सांगितले. नाकाडोंगरी, आष्टी मार्गावर मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्यात आला. मात्र याविषयी पोलिसांना त्याची माहिती नसल्याचे समजते.वरठीत प्रवाशांना फटकावरठी : घटनेच्या निषेधार्थ वरठी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून गावातील सर्व प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये व व्यापारपेठ बंद होती. दुपारी निषेध नोंदवून आरोपीवर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले. बंद पाळण्यासाठी युवकयुवती व महिलापुरुषांनी पुढाकार घेतला होता. बंददरम्यान महिला पुरुषांनी रॅली काढून शासनाविरूद्ध घोषणा दिल्या. राज्यमार्गावर जाळपोळ करून रस्ता अडविला होता. भंडारा मार्गावर धावणारी एसटी बस व आॅटो रिक्षा बंद असल्याचा फटका प्रवाशांना बसला. वाहतुकीची साधने बंद होती. वरठी येथून धावणाºया ३०० आॅटोरिक्षा चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळेरस्ते निर्मनुष्य दिसत होते.पवनीत बंदपवनी : शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून करण्यात आली. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. विकास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सभेमध्ये स्वाभीमानी भीमक्रांती संघटनेचे नेते प्रा.राजेंद्र टेंभुर्णे, राकाँचे शैलेश मयूर, लोमेश वैद्य, बसपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश नंदूरकर, संजय सावरकर, माला समुद्रेकर, काँग्रेसचे प्रकाश देशकर, प्रकाश पचारे, बीआरएसपीचे श्रीकांत शहारे, गौतमी मंडपे, सुरेखा जनबंधू आदी उपस्थित होते. संचालन मनोहर मेश्राम यांनी केले.मोहाडीत उत्स्फूर्त बंदमोहाडी : येथे रॅली काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी नरेश देशभ्रतार, नरेंद्र घडले, पलाश मेश्राम, सुनिता घडले, वंदना तिरपुडे, अनुप घडले, शंतनू शिंगाडे, राजेश शिंगाडे, नलिनी घडले, श्रेयस गजभिये, रजनी सरोदे, नलिनी रामटेके, शारदा खोब्रागडे, वंदना मेश्राम, विणा बागडे, सुनिल रामटेके, नरेश शेंडे यांच्यासह शेकडो बांधव रॅलीत सहभागी झाले होते.बंदचा एसटीला ३५ लाख रूपयांचा फटकाबंदमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा, साकोली, तुमसर, पवनी या आगाराला ३५ लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला. बुधवारला सकाळच्या सत्रात बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र सकाळी १० वाजतानंतर परिस्थतीनुसार बसफेºया बंद करण्यात आल्या. एसटी बसेस बंद राहिल्याने जिल्ह्यातील बसस्थानक व मार्गावरील प्रवासी निवाºयासमोर प्रवासी अडकून पडले होते.शहापुरात टायर जाळलेशहापूर : येथील उड्डाणपुलावरील दोन्ही रस्त्यावर टायर जाळल्यामुळे पोलिसांची सुरक्षा तैनात होईपर्यंत महामार्गावरील वाहतूक बंद होती. यावेळी आंबेडकरी जनतेने शासनाविरूद्ध घोषणा दिल्या. पोलीस उपनिरीक्षक आर.आर. नागरे यांनी उपस्थितांना शांततेचे आवाहन केले. महसूल प्रशासनाच्यावतीने तलाठी पुष्पम लिमजे उपस्थित होते.बंदचा सनफ्लॅग कामगारांना फटकाबंदचा फटका सनफ्लॅगच्या कामगारांना बसला. रात्रपाळीत काम करणाºया शेकडो कामगारांना आज सकाळपाळीतील कामगारांना पोहोचता आले नाही. सकाळपासून आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सकाळपाळीतील कामगारांना कंपनीत जाता आले नाही. त्यामुळे कामगारांना दुसºया पाळीतील काम करावे लागले.जवाहरनगरात कडकडीत बंदजवाहरनगर : सकाळी ७ वाजेपासून बंदचा परिणाम दिसून आला. भीमसैनिकांनी रॅली काढून व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा महाविद्यालय बंद करण्याचे आवाहन केले. वाहतूक सेवा ठप्प झाल्याने प्रवासी ताटकळत उभे होते. सुव्यवस्थेसाठी ठाणेदार ए.के. नेवारे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.लाखनी पालांदुरात बंदलाखनी : येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी तहसील कार्यालय चौकात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्राचार्य धनंजय तिरपुडे, अ‍ॅड.प्रशांत गणवीर, भीकाराम बागडे, विठोबा कांबळे, विशाल भोयर, विनोद रामटेके, सुरज बागडे, आशिष गणवीर, यांच्यासह भीमसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. पालांदूर येथे शांतता मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठाणेदार अंबादास सुनगार यांना मा.स. शेंडे, दिलवर रामटेके, रमेश गोंडाणे, दिलीप बडोले, मनोज घरडे, प्रमोद वालदे, बिंदू कोचे, अनुप गेडाम, भिकेंद्र शेंडे, सुमन शेंडे हे निवेदन देताना उपस्थित होते.सकाळच्या सत्रात आगारातून बसगाड्या सोडण्यात आल्या. या बसफेºयांमधून आगाराला काही प्रमाणात उत्पन्न प्राप्त झाले. मात्र सकाळी ९.३० वाजतानंतर वरिष्ठांचे आदेश मिळताच बसफेºया काही वेळासाठी बंद करण्यात आले. या बंदमुळे भंडारा आगाराला ५ लाखांचा नुकसान होऊ शकतो.- फाल्गुन राखडे,आगार व्यवस्थापक, भंडारा.