शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

Bhandara: ढग काळेकुट्ट, पण पाऊस रिमझिम; भंडारा जिल्ह्यात केवळ ६ टक्केच रोवणी, शेतकरी संकटात

By युवराज गोमास | Published: July 11, 2024 2:55 PM

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात यंदा १,८९,१५५ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड होणार आहे. त्यातही सर्वाधिक १,७२, ६३८ हेक्टरवर भात पिकाच्या लागवडीचे नियोजन आहे. परंतु, अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे.

- युवराज गोमासेभंडारा : जिल्ह्यात यंदा १,८९,१५५ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड होणार आहे. त्यातही सर्वाधिक १,७२, ६३८ हेक्टरवर भात पिकाच्या लागवडीचे नियोजन आहे. परंतु, अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. १ ते १० जुलैपर्यंत जिल्ह्यात ३८२.६ मिमी पाऊस होणे अपेक्षीत असताना १५६.६ मिमी पाऊस झाला आहे. सुमारे २३१ मिमी पावसाची तूट आहे. परिणामी जिल्ह्यात केवळ ६ टक्के रोवणी आटोपली आहे. आकाशात विजांच्या कडकडाटासह काळेकुट्ट ढग तयार होत असताना रिमझीम पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतकरी देवा आतातरी जोरकस पाऊस बरसू दे, अशीची भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत.

जिल्ह्यात १० जुलैपर्यंत भात नर्सरी १७,८६० हेक्टर, आवत्या धान २२८७ हेक्टर, भात रोवणी ८५१० हेक्टर क्षेत्रावर झाली असून एकूण १०७९७ हेक्टरवर आतापर्यंत भात पिकाची लागवड आटोपली आहे. भात लागवडीची टक्केवारी ६ आहे. जिल्ह्यात मका पिकाचे लागवड क्षेत्र सातत्याने वाढत आहे. गत वर्षी ४० हेक्टरवर झालेली लागवड यंदा ७० हेक्टरवर होणार आहे. परंतु, आतापर्यंत केवळ १३ हेक्टरवर लागवड आटोपली आहे. गतवर्षी तूर पिकाची ९४४५ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा ११४०० हेक्टरवर लागवडीचे नियोजन असताना ४८८६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी ९८८ हेक्टर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा ११४० हेक्टर पेरणी होणार असताना ७४९ हेक्टर झाली आहे.

जिल्ह्यात खरिपात भाजीपाला लागवडीचे क्षेत्र कमी आहे. गतवर्षी १००४ हेक्टर तर यंदा १२०० हेक्टर भाजीपाला लागवड होणार असताना आतापर्यंत ५३७ हेक्टरवर लागवड झाली आहे. गतवर्षी ७९० हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी झाली होती. यंदा ८२० हेक्टरवर लागवडीचे नियोजन असताना ५८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी २२०५ हेक्टरवर ऊसाची लागवड झाली होती. यंदा २३०० हेक्टरवर लागवड होणार असताना ११८९ हेक्टरवर लागवड झाली आहे.

धान लागवड झालेले क्षेत्र (हे.), टक्केवारी

तालुका  एकूण क्षेत्र  झालेली लागवड   टक्केवारी

भंडारा   २४६६३            ७४७             ०३मोहाडी  २७४५४           ९५६             ०३

तुमसर    २७८९५          ४३६            ०२पवनी      २८९६२          ४७३१           १८

साकोली  १७५४८           ९२१            ०५लाखनी    २२२०६          १३४२           ०८

लाखांदूर   २५८०७         १६६४          ०६एकूण       १७२६३८       १०७९७        ०६

पवनी तालुका सर्वाधिक, तुमसर माघारलेजिल्ह्यात पाऊस रखडल्याने सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी रखडली आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांनी अद्यापही रोवणीस सुरूवात केलेली नाही. १० जुलैपर्यंत पवनी तालुक्यात सर्वाधिक १८ टक्के रोवणी आटोपली असून तालुका जिल्ह्यात अव्वल आहे. तुमसर तालुका यंदा माघारला असून केवळ २ टक्के राेवणी आटोपली आहे.

 

१० जुलैपर्यंत बरसणारा पाऊस, झालेला पाऊस (मिमी)

तालुका    होणारा पाऊस     झालेला पाऊस

भंडारा        ३८९.७            १०२.९मोहाडी      ३४७.९             १४५.१

तुमसर       ३६५.१             १७१.४पवनी         ३६०.९             १९५.२

साकोली     ४१५.६             १२१.८लाखांदूर     ३९६.६             २१४.८

लाखनी       ३९१.२              ९८.६भंडारा एकूण ३८२.६           १५१.६

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र