लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या खासदार पदासाठी येत्या पोटनिवडणूकीत भारिप बहुजन महासंघ आपला उमेदवार उभा करणार आहे. या निवडणूकीसाठी महासंघ पुर्ण शक्तिनिशी उभा असून लवकरच उमेदवाराची घोषणा करण्यात येईल. अशी माहिती राज्यात महासंघाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशअध्यक्ष महेश भरतिया यांनी दिली.रविवारी दुपारी ४ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भरतिया म्हणाले की, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र मागील चार महिन्यांपासून रिक्त आहे. पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. विविध उमेदवारांच्या नावांची चाचपणीही करण्यात आली आहे.सन १९५४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची स्थिती व आताच्या स्थितीत बराच अंतर आहे. शेवटच्या क्षणी उमेदवाराच्या नावाबाबद भारिपचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर निर्णय घेणार आहेत. पत्रकार परिषदेला भारिपचे भंडारा जिल्हाध्यक्ष रंजित कोल्हटकर, गोंदिया जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खोब्रागडे, सुर्यकांत इलमे, सामाजिक कार्यकर्ता परमानंद मेश्राम, संजोग ढोरे, विशाल गोडाणे, श्याम भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पोटनिवडणूक भारिप बहुजन महासंघ लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:31 PM
चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या खासदार पदासाठी येत्या पोटनिवडणूकीत भारिप बहुजन महासंघ आपला उमेदवार उभा करणार आहे. या निवडणूकीसाठी महासंघ पुर्ण शक्तिनिशी उभा असून लवकरच उमेदवाराची घोषणा करण्यात येईल.
ठळक मुद्देपत्रपरिषद : महेश भरतिया यांची माहिती