लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यशवंत पंचायत राज अभियानात भंडारा पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून ३१ लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई येथे होणाऱ्या समारंभात राज्यपाल, मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्र्यांच्या हस्ते पंचायत समितीचा गौरव केला जाणार आहे.ग्राम विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी लोकाभिमुख व आगळेवेगळे उपक्रम राबविणाºया संस्थांना पुरस्कृत केले जाते. यंदा भंडारा पंचायत समितीने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे गत मे महिन्यात केंद्र शासनाचा दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तिकरण राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार भंडारा पंचायत समितीने पटकाविला होता. एकाच वर्षात केंद्र व राज्य शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करुन भंडारा पंचायत समितीने इतिहास निर्माण केला आहे. मुंबई येथे होणाºया सोहळ्यात ३१ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार केला जाणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी कौतुक केले आहे. या पुरस्कारासाठी पंचायत समितीचे सभापती पवन कोराम, उपसभापती वर्षा साकुरे, गटविकास अधिकारी नूतन सावंत यांनी परिश्रम घेतले.
यशवंत पंचायत राजमध्ये भंडारा पंचायत समिती राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:21 AM
यशवंत पंचायत राज अभियानात भंडारा पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून ३१ लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर झाला आहे.
ठळक मुद्दे३१ लाखांचा पुरस्कार राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव