शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

क्रांतिकारी विचारांचा वारसा सांगणारा शहापूरचा भीम मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 6:00 AM

भंडारा तालुक्यातील शहापूर गावाची नोंद आंबेडकरी इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिली गेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९४४ साली शहापूरवासीयांनी भीम मेळाव्याची सुरुवात केली. तेव्हापासून म्हणजे तब्बल ७६ वर्षांपासून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मेळाव्याचे संयोजक मोरेश्वर गजभिये सांगतात, भीम मेळाव्याचा इतिहास रोमहर्षक आणि क्रांतीकारी आहे.

ठळक मुद्देआज उसळणार भीमसागर : १९५४ साली बाबासाहेब आंबेडकरांचे शहापुरात झाले होते आगमन

प्रल्हाद हुमणे।लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : क्रांतिकारी विचारांचा इतिहास सांगणारा शहापूर येथील ऐतिहासिक भीममेळावा म्हणजे आंबेडकरी बांधवांचा वारसा होय. दरवर्षी १६ जानेवारीला आयोजित होणाऱ्या या भीम मेळाव्यामागे रोमहर्षक इतिहास असून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. गुरुवार १६ जानेवारी रोजी आयोजित या भीम मेळाव्याला परिसरातील नव्हे तर जिल्ह्यातील भीमसागर लोटणार आहे.भंडारा तालुक्यातील शहापूर गावाची नोंद आंबेडकरी इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिली गेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९४४ साली शहापूरवासीयांनी भीम मेळाव्याची सुरुवात केली. तेव्हापासून म्हणजे तब्बल ७६ वर्षांपासून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मेळाव्याचे संयोजक मोरेश्वर गजभिये सांगतात, भीम मेळाव्याचा इतिहास रोमहर्षक आणि क्रांतीकारी आहे. १९३८ साली शहापूर गावात रोगाने थैमान घातले होते. त्याला आळा घालण्यासाठी अज्ञानातून एका साधूबाबाला बोलाविले. सूचनेनुसार हवनकुंड बांधण्याचे ठरले. दिवंगत गंगाराम रंगारी यांनी हवनकुंड बांधून दिले. हवनाच्या वेळी रंगारी यांनी हवनकुंडाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परंतु अस्पृष्याच्या हाताने हवनकुंड बाटेल आणि देवीचा कोप होईल म्हणून त्यांना अडविण्यात आले. या प्रकाराने रंगारी व्यथित झाले. बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. त्यांच्यातील स्वाभीमान जागा झाला. आत्माराम गजभिये, जयराम गजभिये, कवडू खोब्रागडे रंगारी यांच्या मदतीला धावले. गावात अस्पृष्य बांधवांची सभा घेतली आणि स्वतंत्र मंदिर बांधण्याची कल्पना आली. लोकवर्गणी आणि श्रमदानातून तेथे मंदिर उभे झाले. विश्वनाथ मंदिर असे त्याचे नामकरण झाले. मंदिराला लागूनच अस्पृष्य कुटुंबातील प्रत्येक दांपत्याला श्रमदानातून तेथे स्वतंत्र विहिर खोदली. हीच प्रेरणा घेऊन परिसरातील गावात अस्पृष्यांसाठी स्वतंत्र विहिरी तयार झाल्या असे मोरेश्वर गजभिये यांनी सांगितले.शहापूर हे परिसरातील मोठे गाव. परिसरातील आंबेडकरी जनतेला शहापूरवासीयांकडून मोठ्या अपेक्षा. परिसरातील आंबेडकरी जनतेला एकत्र आणून बाबासाहेबांच्या कार्याची ओळख पटवून देण्यासाठी एक कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले.१४ जानेवारीला भीमसागर या नावाने कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार १४ जानेवारी १९४४ रोजी सर्वप्रथम भीमसागर कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर दरवर्षी १४ जानेवारीला या कार्यक्रमाचे आयोजन होऊ लागले. १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धम्म दीक्षा घेतली. त्यानंतर मंदिरातील मूर्ती काढून तेथे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्यात आली आणि मंदिराचा चेहरामोहरा बदलून त्याचे बौद्ध विहार असे नामकरण करण्यात आले. दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. यावर्षीही १६ जानेवारी रोजी सायंकाळी समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम आणि रात्री गीत गायनाचे आयोजन करण्यात आले आहे.शहापूर येथे बाबासाहेबांचे स्वागत१९५४ साली भंडारा लोकसभेची पोटनिवडणूक होती. या निवडणुकीच्या निमित्ताने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भंडारा येथे जात होते. वाटेत शहापूर येथे कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवून जल्लोषात स्वागत केले. बाबासाहेबांचे शहापुरला लागलेले पदस्पर्श या भीममेळाव्यासाठी महत्वाची खूणगाठ ठरली. आजही बाबासाहेबांच्या आठवणींना प्रत्येक जण उजाळा देत असतो.१४ ऐवजी १६ जानेवारीला आयोजनशहापूर येथील भीमसागर कार्यक्रमाला नागपुरचे अ‍ॅड.सखारामपंत मेश्राम आले होते. कामठी येथे दरवर्षी १४ जानेवारीलाच भीमसागरचे आयोजन होत असे. त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रमांना बौद्ध बांधवांना उपस्थित राहणे अडचणीचे होते. म्हणून जनतेची गैरसोय टाळण्यासाठी भीमसागर १४ जानेवारी ऐवजी १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात यावा अशी सूचना केली. तसेच या नावाऐवजी भीममेळावा असे संबोधावे असेही सूचित केले. या सूचनांचे त्यावेळी उपस्थितांनी स्वागत केले आणि दरवर्षी १६ जानेवारीला भीममेळावा होऊ लागला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर