नाना पटोलेंच्या जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी, ५ पदाधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 03:56 PM2021-12-21T15:56:51+5:302021-12-21T17:26:07+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यात बंडखोरीचे वातावरण उफाळली असून अधिकृत कांग्रेस उमेदवाराच्या प्रचार न करता अपक्ष उमेदवाराच्या प्रचार करणाऱ्या ५ पदाधिकाऱ्यांना पटोले यांनी ६ वर्षांसाठी निलंबित केले.

bhnadara congress district vice president suspended from party for six years in bhandara | नाना पटोलेंच्या जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी, ५ पदाधिकारी निलंबित

नाना पटोलेंच्या जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी, ५ पदाधिकारी निलंबित

Next

भंडारा : अधिकृत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराच्या प्रचार करणाऱ्या ५ पदाधिकाऱ्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ६ वर्षासाठी निलंबित केले असून यात काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षाचाही समावेश आहे.

ठाणा परसोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जुन्या काँग्रेस उमेदवाराला उमेदवारी न देता भाजप आयात व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे, काँग्रेसमधील काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्या ५ पदाधिकाऱ्यांना पटोले यांनी ६ वर्षासाठी निलंबित केल्याचे पत्र काढले आहे.

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजकपूर राऊत, माजी उपाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव पांडुरंग निशाने, ठाणा क्षेत्राचे जिल्हा परिषद प्रभारी मुन्ना भोंगाडे, ठाणा पंचायत समितीचे प्रभारी जितेंद्र पडोळे यांचा समावेश असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दिली.

Web Title: bhnadara congress district vice president suspended from party for six years in bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.