लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्कील इंडिया, मेकिंग इंडिया योजना आली आहे, लवकर नोकरी लागेल असा विचार करून महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी, आयटीआयकडे वळले. खरे परंतु सध्या महाराष्ट्रात वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. महावितरण ने गेल्या ४ ते ५ वर्षापासून विद्युत सहायक भरतीच घेतलेली नाही.असंख्य सुशिक्षित आयटीआय प्रशिक्षणार्थी हे दिव्यांग, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील, कष्टकऱ्यांची, मोलमजुरी करणाºयांची शेतकºयांची मुले असून महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेल्या ७२ हजार जागांमध्ये महावितरणचा सामवेश नसल्याने, एक प्रकारे महाराष्ट्र शासन गरीब कष्ट करणारे दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचे दिसते. विद्यमान महाराष्ट्राचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, आता त्यांच्याच गृहजिल्ह्यातून आयटीआय बेरोजगारांची फौज निर्माण झालेली असताना, जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे पालकमंत्री साहेब, स्वत:च्या मुलांबाळांशी उपाशी ठेवत, मंत्रीमंडळात काय करतात, हा खरा यक्ष प्रश्न आहे.त्या अनुषंगाने शासनाला जागे करण्याकरिता भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील आयटीआय विजतंत्री बेरोजगार प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने विद्युत सहायकांची पदे तातडीने भरण्यता यावी, विद्युत सहायक भरतीमध्ये दिव्यांग, विधवा, अनाथ, उमेदवारांच्या आरक्षीत जागा तातडीने भराव्या. भरतीमध्ये बीपीएल, अंतोदय, उमेदवारांना विशेष गुण द्यावे. ग्रामविद्युत व्यवस्थापक भरती त्वरीत थांबवावी या मागण्यांना होवून १० जानेवारीला प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्फत उर्जामंत्री, मुख्यमंत्री यांना भंडारा जिल्हाध्यक्ष शांतीलाल तिरपुडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष ओमकार बोटकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी शिल्पकार खोब्रागडे, पंकज शहारे, शिल्पा मसराम, कृष्णकुमार पंधरे, प्रिया कोटांगले, योगेश निंबेकर, हिमांशू गिरीपुंजे, नरेंद्र चौधरी तथा असंख्य भंडारा गोंदियातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
विद्युत सहायक भरतीचे भिजतघोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 9:47 PM
स्कील इंडिया, मेकिंग इंडिया योजना आली आहे, लवकर नोकरी लागेल असा विचार करून महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी, आयटीआयकडे वळले. खरे परंतु सध्या महाराष्ट्रात वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. महावितरण ने गेल्या ४ ते ५ वर्षापासून विद्युत सहायक भरतीच घेतलेली नाही.
ठळक मुद्देप्रशिक्षक उपाशी : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष