शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

भोजराज दीड दशकापासून करतोय राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:36 AM

१४ लोक ०८ के लाखांदूर : ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा’ या झेंडा गीताप्रमाणे राष्ट्रध्वज हा ...

१४ लोक ०८ के

लाखांदूर : ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा’ या झेंडा गीताप्रमाणे राष्ट्रध्वज हा नेहमी उंच फडकत रहावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्नरत असतो. राष्ट्रीय सणाच्या दिवशी प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयात, शाळा-महाविद्यालयात झेंडावंदन केले जाते. यात राष्ट्रध्वजाला सलामी देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. दिवस संपल्यानंतर राष्ट्रध्वजाला सन्मानाने उतरवून तसेच ठेवले जाते. दुसऱ्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्याचा पुन्हा वापर केला जातो. मात्र तालुक्‍यातील एका देशभक्ताकडून गत १५ वर्षापासून राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देण्याचे काम केले जात आहे. भोजराज फागो कडीखाये रा. लाखांदूर असे गत १५ वर्षापासून राष्ट्रध्वजाला मोफत धुवून इस्त्री करून देणाऱ्या देशभक्ताचे नाव आहे.

कपडे धुवून त्यांना इस्त्री करून ग्राहकांना देणे हे त्यांचे वडिलोपार्जित काम. त्यांच्या आजोबांच्या काळापासून कपड्यांना इस्त्री करून दिली जात आहे. त्यांचे लाखांदूर येथे मानव लॉन्ड्री नावाने कपड्यांना इस्त्री करण्याचे दुकान आहे. वर्षभर या दुकानांमधून स्थानिक लाखांदूर येथील नागरिकांचे कपडे धुवून व प्रेस करून दिले जातात. मात्र राष्ट्रीय सणांच्या आठवडाभरा पूर्वीपासून येथे राष्ट्रध्वजाला मोफत धुवून व इस्त्री करण्याचे काम केले जाते.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन या तीन राष्ट्रीय सणांच्या दिवशी तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयात, निमशासकीय कार्यालयात व शाळा महाविद्यालयात राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो. तो दिवस निघून गेला की संध्याकाळच्या दरम्यान शासकीय नियमात राष्ट्रध्वजाला उतरवले जाते. त्यानंतरच्या दुसऱ्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्याच राष्ट्रध्वजाचा पुन्हा वापर केला जातो. मात्र सुरुवातीला वापर केल्यानंतर राष्ट्रध्वजाला मोडी पडल्या असल्याने त्याला इस्त्री करणे आवश्यक असते. सध्याच्या घडीला सर्वत्रच पैसे घेऊन इस्त्री करून देऊन आर्थिक व्यवहार केले जात आहेत मात्र अशाच राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देऊन एक नवीनच देशसेवा येथील तरुण करत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बॉक्स

इथे देताहेत सेवा

गत काही वर्षापासून लाखांदूर येथील पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, शिवाजी विद्यालय, नगरपंचायत कार्यालय, मडेघाट येथील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात आथली, सेवा सहकारी संस्था कार्यालय लाखांदूर, ग्रामपंचायत कार्यालय असोला, शिवाजी प्राथमिक शाळा लाखांदूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखांदूर येथून दरवर्षीच राष्ट्रध्वज धुवून इस्त्री करण्यासाठी येत असल्याची माहिती भोजराज कडीखाये यांनी दिली आहे.

140821\img-20210813-wa0046.jpg

राष्ट्रध्वजाला ईस्ञी करतांना भोजराज कडीखाये