शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

महिलांनी केले महिला रूग्णालयाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 11:57 PM

जिल्हा मुख्यालयी स्वतंत्र महिला रूग्णालय व्हावे, यासाठी आमदार असताना शिवसेनेच्या पुढाकाराने आपण भंडाऱ्यात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय मंजूर करून घेतले.

ठळक मुद्देश्रेय लाटण्याचा भाजपचा प्रयत्न केविलवाना -भोंडेकर

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा मुख्यालयी स्वतंत्र महिला रूग्णालय व्हावे, यासाठी आमदार असताना शिवसेनेच्या पुढाकाराने आपण भंडाऱ्यात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय मंजूर करून घेतले. परंतु आता भाजपकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी अशा लोकांना धडा शिकविला पाहिजे, असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.भंडारा येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, संजय रेहपाडे, अ‍ॅड.वसंत एंचिलवार, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, उपसभापती ललीत बोंदरे, डॉ.अश्विनी भोंडेकर, आशा गायधने, नंदा दुरूगकर, कुमुदिनी कढव, रंजना निमजे, रूपलता वंजारी, यशवंत सोनकुसरे, रवी वाढई उपस्थित होते.यावेळी भोंडेकर म्हणाले, सन २०१२ मध्ये महिला रूग्णालयाला मंजुरी मिळूनही जागेअभावी काम रखडले होते. त्यानंतर आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांना भेटून २०१९ च्यापूर्वी महिला रूग्णालयाला मंजुरी देऊन निधी मंजूर करून द्यावा, अशी आग्रही मागणी केली. अन्यथा शिवसेना पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता, असा गौप्यस्फोट भोंडेकर यांनी यावेळी केला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी महिला रूग्णालयाला मंजुरी देत २५ लाख रूपयांची तरतूद केली. असे असताना भाजपचे आमदार शिवसेनेचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. यावेळी राजेंद्र पटले म्हणाले, मेळाव्यातील महिलांची उपस्थिती हा शिवसेनेचे अस्तित्व दाखविणारा मेळावा ठरल्याचे सांगितले. जया सोनकुमसरे यांनी विकासासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. शिक्षणातून कुटुंबाला प्रगतीकडे नेण्याचा तो विकासमार्ग ठरावा, असे प्रतिपादन केले. यावेळी आशा गायधने, डॉ.अश्विनी भोंडेकर, कुमुदिनी कडव, रंजना निमजे आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक रश्मी पातुरकर यांनी केले.महिलांनी घेतला भूमिपूजनाचा ठरावदरम्यान, महिला रूग्णालयासाठी नियोजित जागेवर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाºयांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. या मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.महिला आघाडीतर्फे सत्कारानंतर भोंडेकर म्हणाले, महिलांनी केलेला हा सत्कारसोहळा माझ्यासाठी प्रेरणादायी असून महिला रूग्णालय पुर्णत्वास येण्यासाठी बळ देणारा आहे. आता या महिला रूग्णालयाचा भुमिपूजनाचा ठराव राज्य शासनाकडे पाठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.