शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 12:08 AM

महामार्ग ओलांडत असताना कारधा चौकात घडली घटना

देवानंद नंदेश्वर, भंडारा: महामार्ग ओलांडत असलेल्या एका ६८ वर्षीय दुचाकीस्वाराला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास महामार्गावरील कारधा चौकात घडली. संपत गोविंदा भोयर (६८, कारधा, ता. भंडारा), असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

संपत भोयर हे एमएटी दुचाकी क्रमांक एमएच ३५ ई ७६०३ ने पालगाव येथून स्वगृही कारधा येथे जात होते. दरम्यान महामार्गाने लाखनीकडून नागपूरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक क्रमांक सीजी ०४ एमटी ९४९६ च्या चालकाने महामार्ग ओलांडत असलेल्या संपत भोयर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे संपत भोयर ट्रकमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने कोणतीच मदत न करता ट्रक सोडून घटनास्थळावरुन पळून गेला.यासंदर्भात जयश बबन बोंदरे (४१, आंबाडी) यांच्या तक्रारीवरुन कारधा पोलिसांनी ट्रकचालकाविरुध्द भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१, १०६ (१), तसेच मोटार वाहन कायदा सहकलम १३४, १८४ नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुदाम कांबळे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात