लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपत्य मुलगा न होता मुलगी जन्माला आली या द्वेष भावनेने १८ महिन्याच्या मुलीचा गळा दाबून जन्मदात्या वडीलानेच खून केला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पाण्डे यांनी शनिवारी आरोपी डाकराम पंढरी घोरमोडे याला आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ही घटना अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गोसेबुज येथे १ सप्टेंबर २०१६ रोजी घडली.माहितीनुसार, गोसे येथील रहिवासी असलेल्या डाकराम घोरमोडे याचे लग्न मनिषा याचे सोबत सन २०१४ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे झाले. संयुक्त कुटूंब असले तरी पती डाकरामकडून मनिषा हिला त्रास सहन करावा लागत होता. प्रसुतीकरिता मनिषा हिला रामटेक तालुक्यातील बोरडा येथे तिच्या माहेरी पाठविण्यात आले होते. १५ जून २०१५ रोजी मनिषा हिने कन्येला जन्म दिला. याची बातमी पती डाकराम याला मिळाली. मुलगी झाल्याचा आनंद न होता, कुटूंबीयात नाराजी व्यक्त करुन डाकराम व त्याचे कुटूंबीय मनिषा व नवजात बाळालाही पाहण्यासाठी गेले नाही. मुलगी १८ महिन्यांची होवूनसुध्दा डाकराम याने मनिषा पत्नी व मुलीला स्वत:चा घरी आणले नाही.यादरम्यान कुटूंबीयातील वरिष्ठ व्यक्तिंनी मध्यस्थी करुन मनिषा व १८ महिन्याच्या मुलीला ९ आॅगस्ट २०१६ रोजी गोसे येथे आणले. परंतु अपत्य म्हणून मुलगा न होता मुलगी झाली, याबाबतचा राग डाकरामने मनात ठेवून पोटच्या मुलीसोबत क्रुरपणे वागणूक देत होता. यावरुन मनिषा हिचा नेहमीच तिरस्कार केला जात होता.घटनेच्या दिवशी १ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मनिषा ही पाणी भरण्याकरिता बाहेर गेली असता. पलंगावर झोपलेल्या १८ महिन्याच्या मुलीचा डाकरामने गळा आवळला.गुंड घेवून परत येत असता डाकराम हा मुलीचा गळा दाबताना दिसताच तिने मुलीकडे धाव घेतली. शक्य असेल तितक्या लवकर मुलीला बाहेर घेवून आली. मुलीचा शरीर थंडगार होवून जीभ बाहेर आल्यासारखी दिसली. यावेळी उपचारार्थ मुलीला नेण्यात आले. यावेळी जबरदस्तीने मनिषा हिला ही दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी मनिषा हिला दवाखान्यात ठेवून मुलीला परत गोसे येथे आणण्यात आले. यावेळी मनिषाने, माझी मुलगी मरण पावल्याची शंका आल्याने याची सुचना माहेरी दिली. या दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट होताच मनिषाचा मनावर मोठा आघात झाला. १ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.डाकराम घोरमोडे यानेच मुलीचा गळा दाबून खुन केला याबाबतची तक्रार मनिषा हिने ३ सप्टेंबर रोजी अड्याळ पोलीस ठाण्यात नोंदविली. तक्रारीवरुन घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू यांनी घटनेचा तपास तत्कालीन ठाणेदार अजाबराव नेवारे यांच्याकडे सोपविला. यावेळी पुन्हा मृत मुलीचा मृतदेह जमिनीतून काढून शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालातून मुलीचा गळा आवळल्यानेच तिचा मृत्यू झाला. अशा अहवाल सादर करण्यात आला. सदर प्रकरण भंडारा जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले. साक्ष, पुरावा व सबळ पुरावे मिळून आल्याने व त्याबाबतचा आरोप सिध्द झाल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पाण्डे यांनी आरोपी डाकराम पंढरी घोरमोडे याला कलम ३०२ भांदवी अंतर्गत आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.तसेच सहा हजार रुपये दंडाची शिक्षाही ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड. दुर्गा तलमले यांनी बाजु मांडली. सदर गुन्ह्यात पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार काशीराम मस्के यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
जन्मदात्याला आजन्म कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:43 PM
अपत्य मुलगा न होता मुलगी जन्माला आली या द्वेष भावनेने १८ महिन्याच्या मुलीचा गळा दाबून जन्मदात्या वडीलानेच खून केला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पाण्डे यांनी शनिवारी आरोपी डाकराम पंढरी घोरमोडे याला आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ही घटना अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गोसेबुज येथे १ सप्टेंबर २०१६ रोजी घडली.
ठळक मुद्देभंडारा न्यायालयाचा निर्णय : १८ महिन्यांच्या मुलीचा गळा आवळून खून, प्रकरण गोसे येथील