भंडारा : सामाजिक न्यायाचे बीजारोपण करणारे, सामाजिक सुधारणांचे उद्गाते राजर्षी शाहू महाराज यांची जयंती स्थानिक लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरी करण्यात आली. प्राचार्य केशर बोकडे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी माध्यमिक विभाग प्रमुख शालिकराम ढवळे, क्रीडा प्रमुख सुनील खिलोटे, ज्येष्ठ शिक्षक शरद बडवाईक, नीता भोंगाडे, शारदा साखरकर, रेखा साठवणे, अनिल करणकोटे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक एस.जी. यावलकर, गीता प्रधान, दीपाली मोहोकार, इकबाल सय्यद, गुलाब तलमले, पांडुरंग कोळवते, अनिल मदारकर, सुनीता ढेंगे, रेखा वाघाये, आशा भानारकर, संध्या गिरेपुंजे, वीणा सिंगणजुडे, निशा पडोळे, योगिता कापगते, मेधाविनी बोडखे, विजयकुमार बागडकर, सारंग उतखेडे, सुनीता कोकाटे, वर्षा बावनकर, स्मिता गालफाडे, जयंती विभागप्रमुख वैशाली तुमाने, तसेच शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराजांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:23 AM