साकोली : सेंदूरवाफा शहरातील दोन्ही सर्व्हिस रोडवर जागोजागी डांबर उखडून मोठे खड्डे पडले, दररोज प्रत्येक जागी तुरळक अपघात होत आहे. गुरुवारी उमेद महिला प्राधिकरणचे अधिकारी लहरीबाबा मठ समोर दुचाकीने खड्डे वाचवायच्या नादात कंटेनरनी थोडक्यात बचावले. स्टेट बँक समोर लक्ष्मीनारायण हायस्कूलचे संचालक नारायण येडे हे दुचाकीने खड्ड्यांमुळे तोल जात पडले होते. असे दिवसेंदिवस अपघातमय खड्डे २४ तासांच्या आत बुजवून साकोली ते सेंदूरवाफा रोड समांतर करण्यात यावा, या मागणीसाठी जेएमसी कंपनीवर हल्लाबोल सुरू होता. कंपनीला लिखित मागितले व तरीही खड्डे न बुजविल्यास व एखादा मोठा अपघात झाल्यास जेएमसी कंपनी जबाबदार राहणार व जनआंदोलन करण्यात येईल, असा संतापजनक इशारा दिला. यावेळी भाजयुमो जिल्हा महामंत्री राधेशाम मुंगमोडे, भाजप तालुका महामंत्री नरेंद्र वाडीभस्मे, विहिंप अध्यक्ष रवी गोखले, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल हलमारे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक पुष्कर करंजेकर, भाजप तालुका सचिव अमित लंजे, निशांत कुडेगावे, हेमंत संग्रामे, प्रवीण पालीवाल, सत्यवान गजभिये, लक्ष्मण कोल्हे, विनोद भोयर, अनिल गुप्ता, दिपक काळसर्पे, हतिश मुंगुलमारे, चिराग कनोजे, तुषार काळसर्पे, साहिल मडावी, आकाश खेकरे, भारत सिडाम, नानू कापगते, हरिश मेश्राम, विकास कापगते, आशिष काशिवार यांच्यासह भाजपा, बजरंग दल, भाजयुमो व विहिंपचे कार्यकर्ते हजर होते.
साकोली जेएमसी कार्यालयावर भाजपचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:36 AM