गृहमंत्री देशमुख यांच्या कारकिर्दीत गृहविभागातील पोलीस खात्याचा व्यक्ती स्वत:करिता व त्यांचा पक्षाकरिता दुरुपयोग करून घेतला आहे.
खासदार डोलकर आत्महत्या प्रकरणात खोटे गुन्हे दाखल करण्यास दबाव आणणे मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्पोटक प्रकरणात हिरेन हत्या प्रकरण घडवून आणणे, निलंबित एपीआय अधिकारी सचिन वाझे यांना असंवैधानिकरीत्या नियुक्ती देणे, व त्यांचामार्फत महिन्याला १०० कोटीची अवैध खंडणी जमा करणे अशा अनेक अवैध प्रकरणात देशमुख सहभागी असल्याने त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळविली आहे त्यामुळे संबंधित सर्व प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याकरिता तसेच या प्रकरणातील अनेक दोषींना शोधण्याकरिता अनिल देशमुखांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी ह्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. याप्रसंगी मोहाडी शहर अध्यक्ष यादोराव कुंभारे, माजी नगरसेवक सेवक चिंधालोरे, सायली पारधी, रविकांत देशमुख, मोहाडी शहर सचिव, दिनेश निमकर, रामदयाल पराते, मोहाडी शहर, सुरेन्द्र बारई, देवकांत पराते, अफरोज पठाण, गिरीधर मोटघरे, किशोर सोनवणे, मंगेश पारधी, नंदनवार, रंजन ढोमने, अंकित निमकर, फिरोज कुंभारे, सखाराम मारबते, बाराई, घनश्याम श्रीपाद, लाला तरारे, सोनु तरारे, मुन्ना निनावे, चंदू डेकाटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.