अडयाळ : अडयाळ येथील यमाजी श्रीराम ढोक यांना आणीबाणीच्या काळात लोकशाही करिता लढा देत असताना अटक करण्यात आली होती. त्यांना अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात तब्बल सहा महिने ठेवण्यात आले होते. ते आज हयात नसले तरी त्यांची पत्नीचे पवनी तालुका भाजपा पदाधिकारी यांनी त्यांचा घरी जाऊन शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात केला. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तिलक वैद्य, उपाध्यक्ष लोकेश गभने, भाजपा पवनी तालुकाध्यक्ष मोहन सुरकर, तालुकाध्यक्ष अमोल उराडे, डॉ. उल्हास हरडे, रविकांत आरिकर, राहुल खोब्रागडे, महेश कुंभलकर, प्रशिक वालदे इत्यादी भाजपा तथा भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आणीबाणीच्या काळात लोकशाही करिता लढा देणाऱ्या लोकांना सन्मान, गौरव करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. माहितीनुसार या बंदिवानांना महिन्याला १० हजार तर मृतकाच्या पत्नीला पाच हजार मिळत होते. आता ती मदत बंद आहे.
भाजप पवनी तालुकातर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:22 AM