प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाळा काशिवार, संघटन मंत्री अरविंद शहापूरकर, किसान आघाडीचे अध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, तु. रा. भुसारी, डाॅ. श्याम झिंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतीभा सेलाेकर, पद्माकर बावनकर, घनश्याम खेडीकर, गुलाब गिरीपुंजे, बाळा शिवणकर, सत्यवान वंजारी, आदी उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे आयाेजन माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांच्या पुढाकारातून करण्यात आले हाेते.
यावेळी माजी आमदार बाळा काशिवार यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. धान खरेदीचा भाेंगळ कारभार महाविकास आघाडीने चालविला आहे. शेतकरी आणि तरुण त्रस्त झाले आहे, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात शिवराम गिरीपुंजे यांनी युवाशक्तीच्या कर्तृत्वाचे माेठे याेगदान आहे. अडचणी साेडविण्यासाठी सहकार्य करून जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले. यावेळी गुणवंत दिघाेरे, ताराचंद मेश्राम, अशाेक बारई, डाॅ. आशिष गभणे, आदित्य गभणे, मेहमूदपठाण, कुशल दिघाेरे, हितेश पडाेळे, पुष्पा दिघाेरे, जीवन काेरे, घनश्याम वलथरे, पिंटू खंडाईत, तेजस खंडाईत, आदींसह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यशस्वीतेसाठी प्रा. आनंदराव मदनकर, नितीन रणदिवे, पंकज रामटेके, मंगेश येवले, उमंग गायधने, आशिष सेलाेटे, सरपंच नरेश फुंडे, सरपंच टिकाराम तरारे, शाम चाेधरी, शिवराम देशमुख, दीपक राठाेड यांनी सहकार्य केले.