महाराष्ट्र शासनाने महावितरण वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली. हे कृत्य अशोभनीय आहे. महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे महापाप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तसेच एक ते दोन महिन्यांपासून मीटर कनेक्शनसाठी पवनी तेथील जनतेने डिमांड भरूनसुद्धा त्यांना मीटर लावून दिले नाही, ते त्वरित लावून द्यावे, सरकारचा जाहीर निषेध करून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. उपविभागीय अभियंता भोयर यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात शहराध्यक्ष अमोल तलवारे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. एकनाथ बावनकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तिलक वैद्य, जिल्हा महामंत्री डॉ. विजया नंदूरकर, शहर महिला अध्यक्ष अनुराधा बुराडे, डॉ. राजेश नंदुरकर, डॉ. सुनील जीवनतारे, योगिता बोरकर, निर्मला तलमले, विनायक फुलबांधे, युवा मोर्चा अध्यक्ष मितेश हटवार, महामंत्री योगेश फुलबांधे, शहर महामंत्री सुरेश अवसरे, विवेक अवचट, दत्तू मुनरतीवार, जिल्हा महामंत्री ओबीसी आघाडी मच्छिंद्र हटवार, महादेव शिवरकर, राजू चोपकर, रामू गजभे, ॲड. राहुल बावणे, ॲड. कावळे, गजानन जीभकाटे, दुष्यंत देशमुख, शंकर पडोळे, पूर्वेश कावळे, अपूर्व तिघरे, रत्नाकर लेपसे, मारुती चाचेरे, रवी माथुरकर, आनंदराव कांबळे, बालाजी लांजेवार, कमलेश पचारे, गजानन बावनकर, योगिता बोरकर, सोनू देविकर. कविता कुळमते, छाया बावनकर व कार्यकर्ते उपस्थित होते.