इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण अर्थव्यवस्था व विकासाचा मुलमंत्र देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या आतमध्ये झगमगाट दिसून येत असला तरी जिल्हा परिषद इमारतीचा सभोवतालचा परिसर स्वच्छ नाही. एकीकडे १ एप्रिलपासून जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छता पंधरवाडा अभियान राबवित असताना 'दिव्याखाली अंधार' असा हा प्रकार दिसून येतो.जिल्हा प्रशासनातील ग्रामीण क्षेत्रातील विकासात्मक कामांचा लेखाजोखा, आराखडा, नियोजन व अंमलबजावणी यासारखी महत्वाची कामे जिल्हा परिषद प्रशासन राबवित असते. यात रस्ते, पाणी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय आरोग्य, स्वच्छता यावरही प्रामुख्याने भर दिला जातो. सन २०१४ पासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने योजना राबविण्यासाठी कुठलीही कसर ठेवली नाही. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात जावून शौचालय बांधणी असो की स्वच्छतेची जनजागृती याबाबत नेहमी विविध उपक्रम राबविले. यात बहुतांश ठिकाणी यशही लाभले. मात्र ज्या कार्यालयातून या योजनांचा शुभारंभ करण्यात आला त्याच कार्यालयाचा परिसर स्वच्छ नाही.जि.प. परिसरातील बहुतांश नाल्यांवरील आच्छादने काही ठिकाणी फुटलेली असून तर काही ठिकाणी आच्छादने नाहीत. गोळा केलेला पालापाचोळा तिथेच जाळला जातो. मुख्य प्रशासकीय ईमारतीच्या मागील बाजूला असलेल्या प्रसाधन गृहामागील दृश्य किळसवाने आहे. ज्या ठिकाणी सभागृह आहे त्याच्या डावीकडील भागात लघुशंका केली जाते. दुर्गंधीमुळे सभागृहाच्या सौंदर्याला बट लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ‘इन’ प्रवेशद्वाराचा ‘होलपास’ तुटलेला असून लहान लोखंडी दरवाजाही तश्याच स्थितीत आहे.जिल्हा परिषदेच्या आतील बांधकामासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करून रूपडे पालटले गेले. तिन्ही मजल्यावरील विविध विभागांसह अधिकारी व पदाधिकाºयांची दालनेही अद्ययावत व सुविधायुक्त आहेत. मात्र जिल्हा परिषदेचा परिसर आजही भकासच दिसून येतो. जिल्हा परिषदेच्या पूर्व भागार कित्येक वर्षांपासून पडीक वाहनांचा भंगार आहे. लहान इमारतींच्या काही भितींना तडेही गेले आहेत. जि.प. सभागृह असलेल्या भागाकडील प्रसाधन गृहात शौचालयाचे हाल झाले आहेत. स्लॅबचा सिमेंटी पोपडाही हळूहळू खचत आहे. पाण्याची व्यवस्था उत्तम असली तरी दुर्गंधीची समस्या कायम आहे. जिल्हाभरातील शेकडो नागरिक विविध कामांसाठी या मिनी मंत्रालयात येतात. परंतू जि.प. चा परिसर पाहून मन प्रसन्न वाटावे, असे जाणवत नाही. पान किंवा खर्रा खावून थुंकणाºया महानुभावांचीही येथे कमी नाही. स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी जितकी जिल्हा परिषद प्रशासनाची आहे, तितकीच नागरिकांचीही आहे.स्वच्छता विभागाने लक्ष द्यावे१ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रामीण जनतेसह सर्वांना स्वच्छतेविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रयत्नही सुरू आहे. मात्र जिल्हा परिषद परिसरातील स्वच्छतेकडेही स्वच्छता विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
आतमध्ये झगमगाट; बाहेर भकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:13 AM
ग्रामीण अर्थव्यवस्था व विकासाचा मुलमंत्र देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या आतमध्ये झगमगाट दिसून येत असला तरी जिल्हा परिषद इमारतीचा सभोवतालचा परिसर स्वच्छ नाही. एकीकडे १ एप्रिलपासून जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छता पंधरवाडा अभियान राबवित असताना 'दिव्याखाली अंधार' असा हा प्रकार दिसून येतो.
ठळक मुद्देव्यथा मिनी मंत्रालयाची : स्वच्छता पंधरवडा कोणत्या कामाचा? दिव्याखाली अंधार, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच