शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

‘सोशल’ भक्तांची अंध मुशाफिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:33 PM

काही वर्षापूर्वी चैनीची वस्तू असलेला मोबाईल आता जीवनावश्यक झाला आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या आदानाप्रदानापर्यंत सर्वच मोबाईलवर होऊ लागले. मोबाईलच्या फायद्यासोबतच त्याच्या दुष्परिणामाचाही सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयाचे तर अनेकांना जणू व्यसन लागले आहे. दररोज धडकणाऱ्या शेकडो संदेशाची खातरजमा न करता पुढे पाठवचा सपाटा सुरु आहे. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देपाठव पुढे : मॅसेजचा अहोरात्र धुमाकूळ

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काही वर्षापूर्वी चैनीची वस्तू असलेला मोबाईल आता जीवनावश्यक झाला आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या आदानाप्रदानापर्यंत सर्वच मोबाईलवर होऊ लागले. मोबाईलच्या फायद्यासोबतच त्याच्या दुष्परिणामाचाही सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयाचे तर अनेकांना जणू व्यसन लागले आहे. दररोज धडकणाऱ्या शेकडो संदेशाची खातरजमा न करता पुढे पाठवचा सपाटा सुरु आहे. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.‘आज रात्री कॉस्मीक किरणांचा मारा होणार, मोबाईल बंद ठेवा’, ‘महत्वाची कागदपत्रे सापडली संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी शेअर करा’, ‘मुलगा-मुलगी हरविली, आईवडीलांचा शोध घेण्यास मदत करा’ यासारखे संदेश व्हॉटस्अ‍ॅपवर तर जयहिंद लिखकर शेअर करे, चोरी छिपे आपका प्रोफाईल कोन देखता है, पुनर्जन्म में आप कौन थे, महाभारत के कोनसा पात्र आप थे अशा पोस्ट फेसबुकवर धडाधड येऊन पडतात. या प्रकाराला नागरिक बळी पडत आहेत.पूर्वी संवादाचे माध्यम असलेला मोबाईल आता गॅझेट्स झाला आहे. कोणतीही गोष्ट अवघ्या काही क्षणात मोबाईलवरून करणे शक्य झाले आहे. त्यातच अलिकडे विविध कंपन्यांचे अती स्वस्तातील डाटाचे पॅकेज त्याला हातभार लावत आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आणि त्याने प्रत्येकाला भुरळ पाडली. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप तर अनेकांचा श्वास झाला आहे. दर पाचदहा मिनिटांनी मोबाईलवर बोटे फिरवून आणि तासन्तास मोबाईलमध्ये मान खुपसून बसणारे दिसून येतात. जणू अनेकांना मोबाईलने आपल्या पाशात अडकविल्याचे दिसून येते.दररोज शेकडो मॅसेज व्हॉटस्अ‍ॅपवर धडकतात. त्यावर येणारे मॅसेज फॉरवर्ड करण्याचा प्रत्येक जण आनंद घेतो. परंतु अनेकदा कोणतीही खातरजमा न करता मॅसेज पाठविला जातो. त्यातून अनेकदा सामाजिक समस्या, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडतात. अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु त्यातून कुणी शिक्षित झाला नाही. अलिकडे तर भीती निर्माण करणारे मॅसेजही येत आहेत. एकाच ग्रुपवर दहादा तोच तो मॅसेज फिरत राहतो. मॅसेजची सत्यता कुणीही पडताळत नाही. आपल्याला माहित झाले, दुसऱ्यांनाही माहित व्हावे म्हणून हा मॅसेज थेट फॉरवर्ड केला जातो. अलिकडे पाच पेक्षा अधिक मॅसेज फॉरवर्ड होत नाहीत. परंतु तरीही अनेक जण असे मॅसेज पाठवतच असतात. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी भविष्यात एखादे कोणते मोठे संकट उभे करेल हे सांगता येत नाही.न वाचता मॅसेज करतात डिलीटप्रत्येकाच्या व्हॉटस्अ‍ॅपमध्ये किमान १० ग्रुप तरी असतात. प्रत्येक ग्रुपवर दिवसाला २० मॅसेज आले तरी दिवसाकाठी २०० मॅसेज धडकतात. त्यासोबतच इमेजेसही असतात. एका दिवशी २०० मॅसेज वाचण्यासाठी कुणालाही वेळ नसतो. मग सर्व मॅसेज एका बटनाने डिलीट केले जातात.