भंडारा : येथील जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा आणि शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोविड -१९ महामारीच्या कालावधीत रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. अशा गंभीर परिस्थितीत महाविद्यालयाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजासाठी आपले योगदान दिले. रक्तदान शिबिरात महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवीत एकूण २४ यूनिट रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन अर्चना यादव, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन अधिकारी) यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री नंदगवली, राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी प्रा. भोजराज श्रीरामे, प्रा. प्रशांत वालदेव, डॉ. वीणा महाजन, क्रीडा विभागाचे डॉ. भीमराव पवार, डॉ. रोमि बीष्ट प्रामुख्याने उपस्थित होते. शासकीय रुग्णालय भंडारा येथील डॉ. सचिन करंजेकर डॉ. सुरेखा भिवगडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जयश्री तिजारे, लोकेश गोटेफोडे, राहुल गिरी,लक्ष्मीकांत भिवगडे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता व निर्धारण कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिकर, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थांनी सहकार्य केले.